Posts

Showing posts from June, 2017

यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक

यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी होईल.या दिवशी मंगळवार आहे. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता..     अमेरिका आहे कशी? अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे व देशात ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी  ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही.  बडी राज्ये    कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटव्हज (जणू लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझें...

तरूणभारतल२३.१०.२०१६

तरूणभारतल२३.१०.२०१६ अध्यक्षीय लढतीचे वृत्तसमालोचन कसे करायचे? एक धरसोड वृत्तीचा, बोलभांड आणि दुसरा व्यवहारवादी, प्रसिद्धीपासून दूर राहाण्याची भूमिका घेऊन चालणारा, नीरस तपशील मांडणारा असेल तर पत्रकारांनी काय करावे? दोघांनाही न्याय कसा द्यावा? खरे असे आहे की, मतदारांपैकी बहुतेकांचे मत अगोदरच निश्‍चित झालेले असते. फारच थोडे कुंपणावर असतात, पण तेच निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यांचे प्रबोधन कसे करावे? डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिटंन यांच्यातील दुसर्‍या अध्यक्षीय वादविवादात सीरियाबाबतचे धोरण, ट्रंप टेप्स, बेकारी, स्थलांतर या विषयांवर गरमागरम चर्चा झाली. त्यात पहिल्या फेरीप्रमाणे हिलरी क्लिटंन यांचाच वरचष्मा राहिला, असे वृत्त आहे. बडे समीक्षक, प्रसार माध्यमे, केवळ डेमोक्रॅट पक्षाचे धुरीणच नव्हे डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काही नेतेसुद्धा त्यांच्याविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. पण सध्यातरी डोनाल्ड ट्रंप टसचे मसही होताना दिसत नाहीत. याचे कारण असे सांगितले जाते की त्यांचा मतदार असा बोलका किंवा बोलभांड नाही. तो जोपर्यंत त्यांची साथ सोडत नाही, तोपर्यंत तरी स्पर्धेतून माघार घेतील...

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी ‘तू नंबर एकची खोटारडी आहेस’ ‘तू तर नालायक आहेस?’ पैसे कसे गोळा केले सांगू का? ‘आणि तू किती कर बुडवलास, ते सांगू का?’ कोणता विषय कसा तापवता येईल व त्याला कोणत्या दिशेने नेता येईल, हे राजकारण्यांकडून शिकावे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथून तिथून सर्व राजकारणी सारखेच, असेही म्हणतात. हे विधान खरे की खोटे हे ठरविण्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी सामान्यत: ते करणार्‍याची असते/असावी, हेही सर्वमान्य असायला हवे. पण काही विषय असे असतात की, ते पसरवण्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते. कारण लोक पुरावे मागण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. असे विषय शोधून काढून त्यांचा आपले म्हणणे सिद्ध करण्याचे बाबतीत राजकारण्यांचे हात कुणी धरू शकणार नाही. सध्या अमेरिकेत समलिंगी लोकांचा महिनाभर चालणारा उत्सव सुरू आहे. या काळात या प्रकारच्या व्यक्तींबद्दलचे विषय चर्चेला येणे ही एरवी एक सामान्य बाब ठरली असती. या मंडळींच्याही काही समस्या असतात. त्यांच्या सोडवणुकीचा मुद्दाही विचारात घेतला जावा, हा विषय या उत्सवाच्या काळातच समोर यावा याचेही आश्‍चर्य वाटायला नको. या मंडळींनी कोणती सार...

हिलरी क्लिंटन व्यक्ती व व्यक्तिमत्त्व

                        हिलरी क्लिंटन व्यक्ती व व्यक्तिमत्त्व वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए(मानसशास्त्र), एम.एड २७२१ प्राईम रोज रोड नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया, अमेरिका   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?    न्यूजर्सी आणि न्यू मेक्सिको येथील प्रायमरीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री हिलरी क्लिटंन यांनी आज देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या डेमॉक्रॅटिक पार्टीची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी प्राप्त केली आहे. ही उमेदवारी मिळविणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी क्लिटंन यांना रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांना टक्कर द्यावी लागणार अशीच चिन्हे आता दिसत आहेत. ही लढत चुरसीची होणार असून, यात त्या विजयी झाल्यास व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार्‍याही त्या पहिल्याच महिला ठरणार आहेत.   अवघे अडुसष्ट वयमान- हिलरी क्लिंटन यांचे आता वय झालेले आहे, हे खरे, पण अमेरिकेत वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या व्यक्ती सुद्धा चांगल्या टुणटु...

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड पराईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनियी   E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?     आंतरजाल(इंटरनेट) व संगणक यांनी जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संज्ञा प्राप्त करून देण्याचे बाबतीत मोठी व महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यातून लहानसहान गोष्टींनाही महत्त्व द्यायचे व त्या विषयाचे चर्वितचर्वण करायचे हा अमेरिकेचा मूळ स्वभावधर्म आहे. तो निवडणूक काळातही कायम असतो. जाॅन एफ केनडी निवडणुकीला उभे होते त्यावेळची एक गोष्ट सांगतात. त्यांच्या लहाव मुलाने एक मांजराचे पिल्लू कानाला धरून उचलल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते . याचा फार मोठा ‘इश्यू’ झाला होता. मुलातील ही क्रूरता आईवडलांचे संस्कार कसे आहेत, ते दाखवते. अशी व्यक्ती अध्यक्ष होण्यास योग्य मानायची काय? वगैरे, वगैरे.     निवडणुकातील महत्त्वाचे विषय बदलले - यावेळच्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवर मात्र जागतिक घडामोडींचा एक वेगळा व विशेष परिणाम दिसतो आहे, त्यातही मुस्लिम जगतातील घडामोडी व इसीस सारखी संघटना...

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम

अमेरिकींचा अभूतपूर्व  संभ्रम  लोकशाही वार्ता २५ .९.२०१६ अमेरिकेत व अमेरिकेबाहेरही उमेदवारांच्या योग्यायोग्यतेचीच चर्चा जास्त होताना दिसते. तसेच ईमेल्स, क्लिंटन फाऊंडेशन, डोनाल्ड ट्रंपचा अरोरावीपणा, उद्धटपणा, अज्ञान, नोकर्‍या, सुरक्षा हेच विषय चर्चिले जाताना दिसतात. हिलरी क्लिंटन यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांच्या प्रकृतीविषयक स्वास्थ्याबाबतच्या जुन्या तर्कांनाही नव्याने उजाळा मिळतोय. यावर उतारा म्हणून डोनाल्ड ट्रंप यांची प्रकृती कोणती धड आहे, अशाही वार्ता कानावर पडत आहेत. यात तथ्य किती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मतदारांना हे दोन्ही उमेदवार मनातून पसंत नाहीत, ही बाब अधोरेखित झाल्यावाचून राहत नाही. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, यात शंकाच नाही. पण इतरही प्रश्न महत्त्वाचे असून ते निवडणुकीच्या निकालावर या बाजूने किंवा त्या बाजूने परिणाम करू शकतात. पण ते सध्यातरी काहीसे मागे पडले आहेत. पण पुढे समोर येऊ शकतील, नव्हे आणले जातील व त्यांचा निवडणुकीच्या निकालावर परिणामही होऊ शकेल. म्हणून ते विचारात घ्यायला हवे आहेत. अमेरिका - मेक्सिको सीमाप्रश्न, जगातील कोणत्याही परागंदा व्यक्तीला ...

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अमेरिकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड चार वर्षांसाठी होत असते. पात्रता : १. उमेदवारांचे कमीत कमी वय पस्तीस वर्षे असले पाहिजे. २. तो अमेरिकेत जन्मलेला (नेटिव्ह-बॉर्न) असावा. ३. त्याचे अमेरिकेत निदान चौदा वर्षे वास्तव्य असले पाहिजे. ४. त्याला तिसऱ्यांदा अध्यक्ष किवा उपाध्यक्षपदी निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारांची पात्रता जरी घटनेने निश्चित केलेली असली, तरी या पदांसाठी राजकीय पक्षांनी उमेदवाराची निवड कशी करावी, याबद्दल घटनेत उल्लेख नाही. त्यामुळे आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्ष आपापली पद्धत निश्चित करतात. मतदार कोण?   मतदानाचा अधिकार कुणाला असावा, हे घटनेत नमूद केलेले आहे. यानुसार वंश, वर्ण, लिंग आणि वय (अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वय असले की झाले) याच्या आधारे कुणाही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येणार नाही. शिक्षा झालेले गुन्हेगार (खून, रोडे, लुटालूट यासारखे गंभीर गु...

कहानीमे ट्विस्ट

कहानीमे ट्विस्ट वसंत गणेश काणे हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप या दोघात आता फक्त केवळ दोन टक्यांचाच फरक उरला असून हिलरी क्लिंटन जरी आजही पुढे असल्या तरी दोनचा फरक डोनाल्ड ट्रंप केव्हाही भरून काढू शकतील, अशी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीची ताजी स्थिती आहे. हे निदान एखाद्या कुडबुड्या ज्योतिष्याचे नसून वॉशिंग्टन पोस्ट व एबीसी यांच्या निवडणुकीसंबंधांवर नजर ठेवून असलेल्या चमूचे आहे. निवडणुकीला जेमतेम एक आठवडा असतांना चुरस एकदम वाढली असून आजवर रुसून बसलेले जवळजवळ सर्व प्रमुख रिपब्लिकन गट डोनाल्ड ट्रंप यांच्या तंबूत परतले आहेत. ४७ टक्के हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने तर ४५ टक्के डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजुला, अशी चुरस असून अन्य सर्व अध्यक्षीय उमेदवार (१00-४७-४५=८) उरलेल्या ८ टक्क्यातच गुंडाळले जातांना दिसत आहेत. अमेरिकन राजकारण पुन्हा द्विपक्षीय राजकारणाकडे वळत असून तिसरी आघाडी हवेतच विरतांना दिसत आहे. तसे पाहिले तर या दोन उमेदवारात असलेला फरक कमीकमी होत चाललेला दिसत होताच. पण तो इतका कमी होईल असे वाटत नव्हते. संख्याशास्त्रीय (स्टॅटिस्टिक्स) भाषेत बोलायचे तर आपल्या निदानात +/- तीन टक्के इतका फरक ...

झंझावातात हरवलेली निवडणूक

झंझावातात हरवलेली निवडणूक वसंत गणेश काणे डेमोक्रॅट पक्ष हिलरी क्लिंटन व टिम केन; रिपब्लिकन पक्ष डोनाल्ड ट्रंप व मायकेल पेन्स; लिबर्टेरियन पक्ष गॅरी जॉनसन व बिल वेल्ड; ग्रीन पार्टी जिल स्टाईन व अजामू बराका; युएस पक्ष डॅरेल कसल व स्कॉट ब्रॅडली; नॅचरल लॉ पक्ष एमिडियो सॉल्टिसिक व अँजेला वॉकर हे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. मात्र सर्व म्हणजे ५0 पैकी ५0 राज्यातील मतपत्रिकेवर डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंट व टिम केन; रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रंप व मायकेल पेन्स व लिबर्टेरियन पक्षाच्या गॅरी जॉनसन व बिल वेल्ड यांचीच नावे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी असतील. ग्रीन पार्टी जिल स्टाईन व अजामू बराका यांची नावे ४0 राज्यातील मतपत्रिकेवरच असतील. कारण या राज्यातच त्यांच्या सर्मथक मतदारांची नावे पुरेशा प्रमाणात मतनोंदणीचे वेळीच नोंदविलेली आहेत. अमेरिकेत मतदाराची नोंदणी होते तेव्हाच तो मी अमुक पक्षाचा मतदार आहे असे नोंदवू शकतो. आता आणखी तीन पक्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या तीन जोड्या उरल्या आहेत. यापैकी काही जोड्यांची काही राज्यात नोंदविलेली असतील किंवा नसतीलही. पण मग एखाद्य...