अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक
अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड चार वर्षांसाठी होत असते. पात्रता : १. उमेदवारांचे कमीत कमी वय पस्तीस वर्षे असले पाहिजे. २. तो अमेरिकेत जन्मलेला (नेटिव्ह-बॉर्न) असावा. ३. त्याचे अमेरिकेत निदान चौदा वर्षे वास्तव्य असले पाहिजे. ४. त्याला तिसऱ्यांदा अध्यक्ष किवा उपाध्यक्षपदी निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारांची पात्रता जरी घटनेने निश्चित केलेली असली, तरी या पदांसाठी राजकीय पक्षांनी उमेदवाराची निवड कशी करावी, याबद्दल घटनेत उल्लेख नाही. त्यामुळे आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्ष आपापली पद्धत निश्चित करतात.
मतदार कोण?
मतदानाचा अधिकार कुणाला असावा, हे घटनेत नमूद केलेले आहे. यानुसार वंश, वर्ण, लिंग आणि वय (अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वय असले की झाले) याच्या आधारे कुणाही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येणार नाही. शिक्षा झालेले गुन्हेगार (खून, रोडे, लुटालूट यासारखे गंभीर गुन्हे करणारे) यांना मतदानाचा हक्क नाही. ज्या नागरिकांची मतदार होण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाने रजिस्ट्रेशन (पंजीयन) केले पाहिजे, असा नियम आहे. नागरिकत्वाचे नियम घटनेत नमूद केले आहेत.
उमेदवार निश्चित करण्याची पद्धत
प्रत्येक राजकीय पक्ष (अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे दोनच प्रमुख राजकीय पक्ष आहेत. इतर पक्ष खूपच लहान आहेत.) प्रत्येक राज्यात (प्रांतात) स्टेट प्रायमरीज आयोजित करतात. या पक्षविशिष्ट (पार्टी स्पेसिफिक) सतात. म्हणजे रिपब्लिकन्सच्या प्रायमरीमध्ये त्याच पक्षाचे सदस्य असलेले मतदार मतदान करतात. या पद्धतीला क्लोज्ड प्रायमरी असे णतात. याउलट ओपन प्रायमरीमध्ये मतदार( तो पक्षसदस्यच असला पाहिजे, असे नाही) कोणत्याही पक्षाच्या प्रायमरीत मतदान करू शकतो. पण मग त्याला दुसऱ्या पक्षाच्या प्रायमरीत मात्र मतदान करता येत नाही. या निवडणुकीत ते डेलिगेट्सची (प्रतिनिधी) निवड करतात. यात कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी किती डेलिगेट्स हेत, ते निश्चित होते. हे डेलिगेट्स पक्षांच्या संमेलनात (कन्व्हेनशन्स) सहभागी होऊन अध्यक्षपदासाठी कोण उमेदवार असावा, ते मतदान करून निश्चित करतात. अशा प्रकारे अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन प्रत्येक पक्ष करीत असतो. उमेदवार निश्चित करण्याची दुसरीही एक पद्धत आहे. तिला कॉकस असे म्हणतात. याचे स्वरूप मेळाव्यासारखे (गेट-टु-गेदर) असते. स्थानिक पातळीवरचे लोक डेलिगेट्स (प्रतिनिधी) निवडतात. ते जिल्हास्तरावर (काऊंटी) जाऊन डेलिगेट्स (प्रतिनिधी) निवडतात. हे डेलिगेट्स (प्रतिनिधी) विभागस्तरावरचे लिगेट्स (प्रतिनिधी) निवडतात. यानंतर राज्यस्तरावरचे आणि शेवटी संमेलनस्तरावरचे डेलिगेट्स (प्रतिनिधी) निवडले जातात. कोणत्या उमेदवाराच्या वाट्याला किती डेलिगेट्स यावेत यासाठी डेमोक्रॅटिक पक्ष प्रपोर्शनल मेथडचा (प्रमाणशीर पद्धतीचा) वापर करतो. जसे -समजा का राज्याच्या वाट्याला वीस डेलिगेट्स आहेत. ‘अ' या उमेदवाराला सत्तर टक्के, ‘ब' या उमेदवाराला वीस टक्के, तर ‘क' ला दहा टक्के मते ळाली असतील, तर ‘अ' च्या वाट्याला चौदा डेलिगेट्स, ‘ब' च्या वाट्याला चार डेलिगेट्स, तर ‘क' च्या वाट्याला दोन डेलिगेट्स येतील. रिपब्लिकन पक्ष काही राज्यांत ही पद्धती, तर काही राज्यांत विनर टेक-ऑल (जो जीता वही सिकंदर) या पद्धतीचा वापर करतो. या न्यायाने वीसच्या वीस म्हणजेच सर्व डेलिगेट्स ‘अ' च्या वाट्याला येतील. कारण सर्वात जास्त म्हणजे चौदा डेलिगेट्स त्याच्या वाट्याला आले आहेत. प्रत्येक राज्यात अशा प्रकारे प्रत्येक पक्षाचे (प्रायमरी किवा कॉकस द्वारे) डेलिगेट्स निवडले जातात. ही अप्रत्यक्ष निवडणूक झाली. यात राजकीय पक्ष उमेदवाराची निवड करीत नाहीत, तर उमेदवाराची निवड करणाऱ्या डेलिगेट्सची निवड करतात. यासाठी प्रत्येक पक्षाचे राष्ट्रीय संमेलन (नॅशनल कन्व्हेंशन) आयोजित होत असते. प्रत्येक राज्याच्या या विषयीच्या कायद्यानुसार तसेच पक्षाच्या नियमांना अनुसरून मतदार आपल्या पसंतीचा अध्यक्षीय उमेदवार कोण आहे, तेही नोंदवून डेलिगेट्सची निवड करतात. आता याच उमेदवाराला पक्षाच्या संमेलनात मत देण्याचे बंधन (बाऊंड) या डेलिगेट्सवर असते. कधी कधी ‘क्रॉस व्होटिगही' होते. यांना ‘फेथलेस' (अविश्वसनीय) इलेक्टर असे म्हणतात. यांचे प्रमाण खूपच कमी आहे. काही राज्यांत उमेदवारांच्या नावाचा उल्लेख न करता डेलिगेट्सची निवड केली जाते. राज्यागणिक किती डेलिगेट्स सावेत हे जो तो पक्ष ठरवीत असतो. सर्वच डेलिगेट्स याच पद्धतीने निवडले जातात, असे नाही. पक्षातील महत्त्वपूर्ण व्यक्तींची निवड डेलिगेट्स म्हणून ते ते पक्ष करतात. हे अलिप्त (अनप्लेज्ड) डेलिगेट्स असतात. डेमोक्रॅटिक पक्ष आपल्या पक्षातील नेते आणि पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेले पदाधिकारी यांची निवड करतात. यांना ‘सुपर डेलिगेट्स' असे म्हणतात. निवडून आलेले हे सर्व डेलिगेट्स बहुमताने आपल्या पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार निश्चित करतात. अध्यक्षीय उमेदवार उपाध्यक्षीय उमेदवाराची निवड करतो. या निवडीवर संमेलनात फक्त मान्यतेची मोहोर उठविण्याचेच काम होते. उपाध्यक्षाला ‘रनिंग मेट' म्हणण्याची प्रथा आहे. या दोघांचे मिळून एक ‘टिकेट' (जोडगोळी) तयार ते. रनिंग मेट आणि अध्यक्षीय उमेदवार परस्परपूरक असतील, असे धोरण अध्यक्षीय उमेदवार स्वीकारत असतो. असा समतोल साधताना भौगोलिक, विचारसरणीविषयक, प्रशासकीय अनुभव आदी वैशिष्ट्ये लक्षात घेऊन जोडीदार निवडला जातो. मतदारांना एका जोडगोळीची वड करावी लागते. ‘एक' एका जोडीतला आणि ‘दुसरा' दुसरया जोडीतला निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना नसते.
अध्यक्षीय निवडणूक
अध्यक्षीय निवडणूक दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर यांच्या मध्ये ज्या तारखेला मंगळवार असेल त्या दिवशी अध्यक्षपदासाठी मतदान होते. २००८ मध्ये चार नोव्हेंबरला मंगळवार होता. तर २०१२ मध्ये सहा नोव्हेंबरला मंगळवार आहे. २०१६ मध्ये ८ नोव्हेंबरला मंगळवार आहे. पन्नास राज्ये आणि कोलंबिया जिल्हा अशा एक्कावन ठिकाणी मतदार ‘ इलेक्टर्स' ची निवड करतात. कोण कोणत्या टिकेटचा (जोडगोळीचा) पुरस्कर्ता आहे, याचा विचार करून मतदार मतदान करतात. अशाप्रकारे वडून आलेल्या इलेक्टर्सचे ‘इलेक्टोरल कॉलेज' तयार होते. राज्यागणिक किती इलेक्टर्स असावेत? त्यांची संख्या, त्या राज्यातून निवडून लेल्या सिनेटर्स आणि रिप्रेझेंटेटिव्हज यांच्या संख्येइतकी असते. आपल्या येथे ज्या प्रमाणे संसदेची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन भागृहे आहेत त्याप्रमाणे अमेरिकेत काँग्रेसची (त्यांच्या संसदेची) सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अशी दोन सभागृहे आहेत. सिनेटमध्ये एका राज्याला दोन अशाप्रकारे एकूण शंभर सिनेटर्स असतात. तर रिप्रेझेंटेटिव्हजची संख्या त्या त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार (नुकतीच आटोपलेली जनगणना आधाराला घेऊन) ठरते. यासाठी संपूर्ण अमेरिका देशाची चारशे पस्तीस (४३५) हाऊस डिस्ट्रिक्ट्समध्ये (मतदारसंघात) विभागणी केलेली असते. प्रत्येक हाऊस डिस्ट्रिक्ट एका प्रतिनिधीची निवड करतो. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यांच्या वाट्याला येणाऱ्या हाऊस डिस्ट्रिक्ट्सची संख्या बदलते. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याच्या वाट्याला जास्त हाऊस डिस्ट्रिक्ट्स मिळतात. प्रत्येक इलेक्टरला एक मत असते. त्या मताला इलेक्टोरल व्होट, असे नाव आहे. ज्या टिकेटला (जोडगोळीला) अध्र्यापेक्षा जास्त मते (इलेक्टोरल व्होट्स) मिळतील तो अध्यक्ष म्हणून निवडला जातो. सध्या हा आकडा दोनशे सत्तर (२७०) आहे. त्याचा जोडीदार अर्थातच उपाध्यक्षपदी निवडून येत असतो. कारण त जोडगळीला असते.
नॅशनल पॉप्युलर व्होट
सर्वसाधारण मतदारसुद्धा अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करतात. पण या मतदानाच्या आधारे विजयी उमेदवार ठरत नाही. तो इलेक्टोरल कॉलेज व्होट्सच्या आधारे ठरतो. आजवर अमेरिकेत अध्यक्षपदासाठी छप्पन वेळा निवडणूक झाली आहे. त्यापैकी बावन (५२) वेळी नॅशनल पॉप्युलर व्होटमध्ये ज्या उमेदवाराला जास्त मते होती, त्याच उमेदवाराला इलेक्टोरल कॉलेज व्होट नुसारही जास्त मते होती. पण नॅशनल पॉप्युलर व्होट नुसार कमी मते मिळून सुद्धा इलेक्टोरल कॉलेज व्होट नुसार जास्त मते मिळवून उमेदवार विजयी होऊ शकतात. जर कुणालाच इलेक्टोरल कॉलेज व्होट नुसार अध्र्यापेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अध्यक्षाची निवड करते. अशावेळी समजा पाच उमेदवार (समजा अ, ब, क, ड, इ) रिंगणात असतील आणि त्यांना अनुक्रमे चाळीस, वीस, सोळा, चौदा आणि सहा अशी मते असतील, तर पहिल्या तिघांमधून म्हणजे अ, ब, क मधून अध्यक्षाची निवड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज करते. (अमेरिकेत दोन मुख पक्ष असले तरी लहान-मोठे पक्ष याशिवाय आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोनपेक्षा जास्त उमेदवार असतात.) या विषयापुरते प्रत्येक ज्याला एकच मत असते. तर सिनेटचे शंभर सदस्य पहिल्या दोन उमेदवारांमधून उपाध्यक्षांची निवड करतात. २००८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे मेदवार बराक ओबामा यांना अठ्ठावीस राज्यांत विजय मिळाला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅकेन यांना बावीस ज्यांत बहुमत होते. बराक ओबामा यांना मिळालेली इलेक्टोरल व्होट्स तीनशे पासष्ट होती, तर जॉन मॅकेन यांना एकशे त्र्याहत्तर मते होती.
मतपत्रिकेचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप
ही मतपत्रिका संयुक्त स्वरूपाचीअसते. याच कागदावर शिक्षण मंडळाच्या सदस्यत्वासाठी उभे असलेले उमेदवार, न्यायाधीश पदासाठी उभे असलेले उमेदवार, यांच्यासाठीही मते नोंदवावयाची असतात. घटनादुरुस्तीबाबत सार्वमत घेण्यासाठीचा प्रश्नही याच मतपत्रिकेवरअसू शकतो. असे अनेक तपशील व पर्याय मतदारांना नोंदवावयाचे होते. उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये आपल्या पसंतीचा एकही उमेदवार नसेल, तर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव नोंदविण्यासाठी रकाना मोकळा सोडलेलाअसतो. अर्थात असा उमेदवार निवडून येण्याची शक्यता खूपच कमी असते.
प्रचार पद्धती
रेडिओ व टेलिव्हिजनची जागा आता ‘नॅशनल अॅडव्हर्टाइजमेंट' राष्ट्रीय विज्ञापन घेऊ पाहत आहे. इंटरनेट, वेबसाईट, फेसबुक आणि मायस्पेससारखे सोशल नेट वर्किंग, यू ट्यूब सारखी चॅनेल्स, ई-मेल्स, ब्लॉग्ज, सेल फोन्स यांचा उपयोग धनदांडगे वारेमाप करू लागले, तर निकोप लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेचे ठरणार नाही का, अशी चिंता अमेरिकेत व्यक्त होत आहे. अध्यक्ष निवडण्याची अमेरिकन पद्धत हा एका ग्रंथाचा विषय व्हावा, इतका मोठा व क्लिष्ट आहे. याला एखाद्या टेखानी लेखाने गवसणी घालण्याचा प्रयत्न करण्यास कदाचित देवदूतही धजावणार नाहीत, पण म्हणून तो कुणीच करू नये असे थोडेच आहे? ९४२२८०४४३०

Comments
Post a Comment