कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी
कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी
‘तू नंबर एकची खोटारडी आहेस’
‘तू तर नालायक आहेस?’
पैसे कसे गोळा केले सांगू का?
‘आणि तू किती कर बुडवलास, ते सांगू का?’
कोणता विषय कसा तापवता येईल व त्याला कोणत्या दिशेने नेता येईल, हे राजकारण्यांकडून शिकावे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथून तिथून सर्व राजकारणी सारखेच, असेही म्हणतात. हे विधान खरे की खोटे हे ठरविण्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी सामान्यत: ते करणार्याची असते/असावी, हेही सर्वमान्य असायला हवे. पण काही विषय असे असतात की, ते पसरवण्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते. कारण लोक पुरावे मागण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. असे विषय शोधून काढून त्यांचा आपले म्हणणे सिद्ध करण्याचे बाबतीत राजकारण्यांचे हात कुणी धरू शकणार नाही.
सध्या अमेरिकेत समलिंगी लोकांचा महिनाभर चालणारा उत्सव सुरू आहे. या काळात या प्रकारच्या व्यक्तींबद्दलचे विषय चर्चेला येणे ही एरवी एक सामान्य बाब ठरली असती. या मंडळींच्याही काही समस्या असतात. त्यांच्या सोडवणुकीचा मुद्दाही विचारात घेतला जावा, हा विषय या उत्सवाच्या काळातच समोर यावा याचेही आश्चर्य वाटायला नको. या मंडळींनी कोणती सार्वजनिक स्वच्छालये वापरावीत, महिलांसाठीची की पुरुषांसाठीची, हा विषय या काळात नव्याने पुढे आला. त्यांनी त्यांना हव्या त्या स्वच्छतागृहाचा वापर करावा, असे मत व्यक्त होताच जोरदार विरोधी प्रतिक्रिया उमटायला प्रारंभ झाला. समलिंगी विवाहाला मान्यता देण्याचे कायदे अमेरितील राज्यांमध्ये पारित होत आहेत. या आणि अशा भूमिकांमुळे संतापलेल्या ओमर मतीनने - एका माथेफिरूने- फ्लोरिडा राज्यातील ऑलर्ॅंडो येथील पल्स नावाच्या केवळ गे लोकांसाठी असलेल्या नाईट क्लबमध्ये घुसून स्वयंचलित शस्त्राचा वापर करून ५0 जणांचा बळी घेतला व शंभरावर लोकांना जायबंदी केले.
रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवार( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) ट्रंप या चतुर राजकारणी गड्याने या हत्याकांडाचा फायदा घेत म्हटले की, इस्लामी दहशतवादाबाबत मी सुरवातीपासूनच जे सांगत होतो, ते खरे निघाले की नाही ते पहा. आता ओबामांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायलाच हवा. मुस्लिमांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालायलाच हवी. कारण असे की, मतीन हा हत्यारा इस्लाम धर्मीय होता व त्याचे पूर्वज दोन पिढ्या अगोदर अफगाणिस्थानातून अमेरिकेत आले होते.
डेमोक्रॅट पक्षाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या गृहित उमेदवर ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) - हिलरी क्लिंटन यांना सुद्धा यावेळी अशीच कडक भूमिका तात्काळ घेणे भाग पडले. त्या म्हणाल्या,' आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. या प्रश्नाबाबत धरसोड उपयोगाची नाही. निर्धारपूर्वक इसिसचा समाचार घ्यायलाच हवा. जी मूल्ये उराशी बाळगून अमेरिका उभी आहे, ज्या मूल्यांचा आपल्याला अभिमान आहे, त्यांच्या रक्षणासाठी इसिसशी युद्ध केले पाहिजे.' थोडक्यात काय तर अशा प्रकारे दोन्ही पक्षांनी या घटनेचे इस्लाम कनेक्शन गृहीत धरले आहे.
वास्तविक या प्रश्नाचे समाजशास्त्रीय विेषण करणारा एक विस्तृत लेख एका अधिकारी व्यक्तीने लिहिला आहे. जेम्स अँलन फॉक्स हे गुन्हेगारीशास्त्र (क्रिमिनॉलॉजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पॉलिसी) या विषयांचे नॉर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. ते म्हणतात, 'या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. एकदम निष्कर्ष काढणे बरोबर नाही. तसे न करता एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्यार्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसिसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती जेव्हा या घटनेची लगेच दखल घेते आणि पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती, इसिसच्या वतीने विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जाहीर करते, तेव्हा तर जणू आता शंकेला वावच उरलेला नाही, असे आपण समजून चालत आहोत.' हा लेख म्हणजे या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, याचा नमुना ठरावा, असा आहे.
असाच दुसरा लेख संरक्षण व शस्त्रास्त्रे या विषयाचे तज्ञ टॉमस डेव्हिस यांनी लिहिला आहे. हे एक सेवानवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, 'शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह आपण सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीतही धरला तरी ऑलर्ॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. हे एका माथेफिरूचे कृत्य आहे, असे वाटते.'
ओलर्ॅंडो हत्याकांड प्रकरणी 'टाईम्स' या जगविख्यात मासिकाची प्रतिक्रिया सर्वात परिपक्व मानली जाते. या मासिकाने आपले मुखपृष्ठ काळ्या रंगात छापले असून त्यावर पांढर्या रंगात हत्याकांडात बळी पडलेल्या पन्नास स्त्रीपुरुषांची नावे एकाखाली एक अशी पानभर छापली आहेत आणि सोबत लाल रंगात प्रश्न उपस्थित केला आहे की, व्हाय डिड दे डाय?. आतमध्ये या विषयाचे सविस्तर विवेचन करणारा लेख आहे. या प्रतिक्रियेचे अराजकीय व विचार करायला भाग पाडणारे स्वरूप दीर्घकाळ नजरेसमोर येत रहावे असे आहे. पण अमेरिकेतील निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे तर एरवीही असे गंभीर विचार कुणाच्याही पचनी पडत नाहीत.
या प्रश्नाला वेगळे महत्त्व यासाठीही आहे की, डेमोक्रॅट पक्ष मुस्लिम व मेक्सिकन विस्थापितांबद्दल नरमाईची भूमिका घेतो. कारण ते त्यांचे भरवशाचे मतदार आहेत, असा समज आहे व तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या त्या सगळ्या देशात मतपेढीचे राजकारण, मतपेढी उभी करणे, जोपासणे, तिला खूष ठेवणे हा प्रकार निरनिराळ्या स्वरूपात असतोच. कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात एवढाच कायतो फरक असतो. मेरी कमीझ तेरी कमीझसे अधिक सफेद है, एवढेच काय ते एक दुसर्याला म्हणू शकतात.
क्लिंटन कुटुंबावर आणखीही एक आरोप आहे. क्लिंटन फाऊंडेशनला खनिज तेलाच्या भरवशावर श्रीमंत झालेले मध्यपूर्वेतील बहुतेक देश व धनवंत भरघोस मदत करीत असतात. त्यातही सौदी, कतारी व कुवेती लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे मुस्लिम दहशतवाद्यांबद्दल हे कुटुंब नेहमीच नरमाईची भाषा वापरते, असा आरोप आहे. हिलरी क्लिंटन यांचा पाकिस्तानकडे कल असतो, त्याचेही हेच कारण आहे, असे एरवीही होत असलेले आरोप व कुजबुज हे प्रकार आज निवडणुकीच्या काळात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेने ऐकू येत आहेत. ओबामा प्रशासनाने - म्हणजे डेमोक्रॅट प्रशासनाने- तर बेकायदा प्रवेश करणार्या सर्व विस्थापित व स्थलांतरित यांची नागरिकत्व व/वा ग्रीन कार्डाबाबतची प्रकरणे (की ज्यात मेक्सिकन व मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे) तातडीने निकाली काढत आणली आहेत. आता ते त्यांचे भरवशाचे मतदार ठरणार हे निश्चित आहे. यामुळे रीतसर पद्धतीने नागरिकत्व व/वा ग्रीन कार्ड मिळवणार्र्यांचा नंबर खाली घसरला आहे (दरवर्षी किती लोकांची प्रकरणे निकाली काढायची हा आकडा निश्चित असतो व त्यातला फार मोठा हिस्सा या लोकांना मिळाला आहे). इथला भारतीय समाज यामुळे ओबामा प्रशासनावर म्हणजेच पर्यायाने डेमोक्रॅट पक्षावर नाराज आहे. याची डेमोक्रॅट पक्षाला फारशी चिंता नाही. कारण भारतीय लोकांचा कल सामान्यत: रिपब्लिकन पक्षाकडे असतो, असे मानले जाते. अमेरिका पाकिस्तानला का चुचकारत असते, याचे रहस्यही यातच दडलेले आहे, असे मानतात. डेमोक्रॅट पक्षाच्या मतपेढीत अल्पसंख्यांक व आफ्रिकन अमेरिकन यांचा फार मोठा वाटा आहे, असे मानले जाते. याबाबत डेमोक्रॅट पक्षाचे आपल्या येथील कॉंग्रेस पक्षाशी साम्य दिसते. अर्थात मतपेढीची गणिते नेहमीच इतकी साध्या बेरीज वजाबाकीची नसतात. यात प्रसंग, व्यक्ती, तात्कालिक लाभ यासारख्या मुद्यांमुळे फरक पडतो. पण सध्यातरी या प्रश्नावरून ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावर मात केल्याचे चित्र आहे.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, तरूण मतदार दिवसेदिवस ट्रंप यांच्याकडे अधिकाधिक संख्येत आकृष्ठ होत आहेत. त्यांचे अजब तर्कटही त्यांना भावते. हत्यार्याचे मुस्लिम अफगाणी पूर्वज दोन पिढ्या अगोदरच अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. मुस्लिमांना आर्शय देण्याचे धोरण वेळीच( म्हणजे तेव्हापासून) बदलले असते तर आज हे हत्याकांड झाले नसते, हा त्यांचा तर्कही मतदारांना पटतो आहे.
वास्तविक त्याच सुमारास अनेक स्थलांतरित /विस्थापित अमेरिकेत येऊन स्थायिक झाले असतील आणि तेव्हापासून ते गुण्यागोविंदाने अमेरिकेत राहात व वावरत असतील. पणते काहीही असले तरी मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे अमे रिकेतील राजकारण पार ढवळून निघत आहे हे मात्र नक्की.
<< Back to Headlines

Comments
Post a Comment