अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
पराईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनियी
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आंतरजाल(इंटरनेट) व संगणक यांनी जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संज्ञा प्राप्त करून देण्याचे बाबतीत मोठी व महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यातून लहानसहान गोष्टींनाही महत्त्व द्यायचे व त्या विषयाचे चर्वितचर्वण करायचे हा अमेरिकेचा मूळ स्वभावधर्म आहे. तो निवडणूक काळातही कायम असतो. जाॅन एफ केनडी निवडणुकीला उभे होते त्यावेळची एक गोष्ट सांगतात. त्यांच्या लहाव मुलाने एक मांजराचे पिल्लू कानाला धरून उचलल्याचे चित्र प्रसिद्ध झाले होते . याचा फार मोठा ‘इश्यू’ झाला होता. मुलातील ही क्रूरता आईवडलांचे संस्कार कसे आहेत, ते दाखवते. अशी व्यक्ती अध्यक्ष होण्यास योग्य मानायची काय? वगैरे, वगैरे.
निवडणुकातील महत्त्वाचे विषय बदलले - यावेळच्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवर मात्र जागतिक घडामोडींचा एक वेगळा व विशेष परिणाम दिसतो आहे, त्यातही मुस्लिम जगतातील घडामोडी व इसीस सारखी संघटना यांचा परिणाम विशेष दिसतो आहे. तालिबानादी गट तसे पाहिले तर अमेरिकेचीच अनौरस अपत्ये होत. रशियाला बेजार करण्यासाठी जन्माला घातलेले हे भस्मासूर व अन्य अतिरेकी गट आता अमेरिकेवरही उलटले आहेत. पण इसीसचा अमेरिकेतील अंतर्गत राजकारणावर जो परिणाम होतो आहे, ती मात्र एक नवीनच बाब आहे. अर्थात कारणही तसेच आहे. इसीस हे काही भुरट्या कट्टरवाद्यांचे टोळके नाही. त्याला एक तात्त्विक भूमिका आहे, त्यांनी एक विशिष्ट कार्यपद्धती अंगिकारली आहे, विशिष्ट ध्येय समोर ठेवून हे लोक नकराने लढत आहेत. पण एखाद्या भूभागावर त्यांनी अजूनही पक्की पकड मिळविलेली नाही. सध्याची इसीसची धडपड त्यासाठीच चालू आहे. एखादा भूभाग जर उद्या स्थायी स्वरूपात त्यांच्या ताब्यात आला तर इसीस हे एक नवीन व वेगळ्या प्रकारचे प्रभावी सत्ताकेंद्र बनेल, यात शंका नाही.
सर्वच बेजार - केवळ अमेरिकाच इसीस या नव्याने निर्माण होऊ घातलेल्या सत्ताकेंद्रामुळे बेजार आहे असे नाही तर रशिया आणि चीनलाही या सत्ताकेंद्राचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे ही तिन्ही राष्ट्रे इसीसच्या विरोधात असली तरी या तिघांचेही आपापसात हाडवैर आहे. इसीस हे इस्लाममधील सुन्नी या मोठ्या (७९ टक्के मुस्लिम सुन्नी आहेत) संप्रदायाचे संघटन होऊ घातले आहे. हा संप्रदाय इतका कट्टरवादी आहे की तो अन्य मुस्लिम संप्रदायांना मुसलमान मानायलाच तयार नाही आणि त्यांच्यावरही तेवढ्याच तीव्रतेने हल्ले करीत असतो. त्यांनी एकतर सुन्नी व्हावे किंवा मरायला तरी तयार व्हावे, अशी त्यांची नीती व त्यानुसार कृती आहे. मग इतरांची काय कथा? उरलेल्या संप्रदायांमध्ये यात शियापंथीय प्रामुख्याने (जवळपास १९ टक्के) आहेत. ते मात्र इसीसला विरोध करीत आहेत. इसीसच्या उपद्रवाचा अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणावर जो परिणाम होतो आहे, त्याचे स्वरूप वेगळे आहे. पूर्वी अमेरिकन प्रशासनाला व लोकांना जिथेतिथे साम्यवादी दिसत. (ही भीती अगदीच निराधार होती असे नव्हे). आता जिथे तिथे अतिरेकी दिसतात, अशी स्थिती आहे. यातून रिपब्लिक व डेमोक्रॅट पक्षही सुटले नाहीत. त्यातून सध्या निवडणुकीचा मोसम असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष सोयीस्कर अर्थ काढून त्या घटनेचा हवा तसा उपयोग करीत असतो.
या हत्याकांडाचा धनी कोण? - अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील आंर्लॅंडो गावातील ५० लोकांचा बळी घेणारे व त्यापेक्षा जास्त लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची इजा पोचवणारे हत्याकांड पल्स नावाच्या नाईट क्लबमध्ये घडले.हे कृत्य केवळ अमेरिकेलाच नव्हे तर सर्व जगाला हादरा देणारे ठरले. याबाबत अमेरिकेत विविध माध्यमांमध्ये विविध पातळींवर चर्चा, टीकाटिप्पणी होत आहे. हे हत्याकांड एका पल्स नावाच्या नाईट क्लबमध्ये झाले. या ठिकाणी एल जी बि टी लोकांचा वावर असतो. एल जी बी टी म्हणजे काय? तर लेस्बियन (समलिंगी उपभोग प्रिय असलेली स्त्री), गे ( समलिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्ती), बायसेक्स्युअल (स्त्री व पुरुष या दोन्हीबाबत आकर्षण असणाऱ्या व्यक्ती), आणि ट्रान्सजेंडर(लिंग परिवर्तन झालेल्या व्यक्ती). हा विषय अमेरिकेत पुष्कळ मोकळेपणाने व उघडपणे बोलला जातो. या लोकांचे एक स्वतंत्र विश्व असते. समलिंगी विवाहांना मान्यता देणारे कायदे अमेरिकेतील काही राज्यात पारित होत आहेत. या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्या स्वच्छतागृहात जायचे, याबाबतचा काथ्याकूट जवळजवळ गेला महिनाभर अमेरिकेत चालू आहे. त्यांनी हव्यात्या स्वच्छतागृहाचा वापर करावा हे एक मत आहे. तर दुसरे बरेच या मताला विरोध करीत आहेत. या मंडळींचा उत्सव महिनाभर अमेरिकेत सुरू आहे. आॅर्लॅंडो गावातील पल्स या नावाचा एक नाईट क्लब खास या मंडळींसाठीचा आहे. ओमर मीर साद्दिक मतीन या तरुणाचे मानसिक संतुलन कदाचित या वृत्तामुळे बिघडलेले असावे. त्यातच त्याने दोन ‘पुरुषांनी’ एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी चुंबनालिंगन दिलेले पाहिले, त्यामुळे तो अतिशय संतापला होता, असेही एका वाहिनीचे वृत्त आहे. हेच ठिकाण हल्लेखाराने निवडावे, हा तपशील किती महत्त्वाचा आहे, हा मुद्दा सध्या पोलिस यंत्रणेची परीक्षा पाहणारा आहे. कारण या हल्यामागे समलिंगीबद्दल वाटणारी चीड आहे की हे इसीसपासून प्रेरणा घेऊन एकाच व्यक्तीने केलेले अतिरेकी कृत्य आहे, याप्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात सर्व संशोधक यंत्रणा लागली आहे.
धास्तावलेली अमेरिका - आज अतिरेक्यांच्या दहशतीखाली अख्खी अमेरिका वावरत आहे. त्यामुळे हा इस्लामी अतिरेकाचा प्रकार आहे, अशी चर्चा देशभर सुरू व्हायला वेळ लागला नाही. अशी हत्याकांडे या पूर्वी घडली असल्यामुळे हे त्यातलेच एक ताजे हत्याकांड म्हणून स्वीकारले गेले. हत्याकांडाचा पुरता तपशीलही हाती यायचा होता आणि हे कृत्य अतिरेक्यांचे (देशातील किंवा देशाबाहेरील) असल्याची समजूत अधिकारी व्यक्तींनी करून घेतली. त्यातच वार्ता येऊन थडकतली की, हत्याऱ्याने ९११ या क्रमांकावर फोन करून (संकटकाळी पोलीस यंत्रणेशी संपर्क करण्याचा नंबर) आपली इसीसशी बांधिलकी असल्याचे जाहीर केले आणि बोस्टनच्या हत्याकांडाचाही हवाला दिला. यावेळी इस्लामिक दहशतवादापासून प्रेरणा घेऊन दोन भावांनी कुणाकडूनही आदेश न घेता प्रेशर कुकरचा उपयोग करून बोस्टन मॅराथाॅन शर्यत संपतासंपता दोन स्फोट १२ सेकंद व १९० मीटराच्या अंतराने १५ एप्रिल २०१३ ला घडवून आणले होते.
ट्रंप यांचा निष्कर्ष- रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवर( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) ट्रंप या चतुर राजकारणी गड्याने या हत्याकांडाचा फायदा घेत म्हटले की, इस्लामी दहशतवादाबाबत मी सुरवातीपासूनच जे सांगत होतो, ते खरे निघाले की नाही ते पहा. आता ओबामांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायलाच हवा. मुस्लिमांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालायलाच हवी. कारण असे की, मतीन हा हत्यारा इस्लामधर्मीय होता व त्याचे पूर्वज दोन पिढ्या अगोदर अफगाणिस्थानातून अमेरिकेत आले होते. तेव्हाच त्यांना थोपवले असते तर असे घडलेच नसते.
हिलरी क्लिंटन यांचा नाईलाज - डेमोक्रॅट पक्षाच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या गृहीत उमेदवर ( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) - हिलरी क्लिंटन यांना सुद्धा यावेळी अशीच कडक भूमिका तात्काळ घेणे (बहुदा)भाग पडले. आजचा दिवस राजकारण करण्याचा दिवस नाही. या प्रश्नाबाबत धरसोड उपयोगाची नाही. निर्धारपूर्वक इसीसचा समाचार घ्यायलाच हवा. जी मूल्ये उराशी बाळगून अमेरिका उभी आहे, ज्या मूल्यांचा आपल्याला अभिमान आहे, त्यांच्या रक्षणासाठी इसीसशी युद्ध केले पाहिजे. थोडक्यात काय तर अशा प्रकारे दोन्ही पक्षांनी या घटनेचे ‘इस्लाम कनेक्शन’ गृहीत धरले आहे. ट्रंप यांनी संधी साधली तर हिलरी यांना अशीच प्रतिक्रिया व तीही तातडीने देणे भाग पडले.
एका समाजशास्त्रज्ञाची भूमिका - वास्तवीक या प्रश्नाचे समाजशास्त्रीय विश्लेषण करणारा एक विस्तृत लेख एका अधिकारी व्यक्तीने लिहिला आहे. जेम्स अॅलन फाॅक्स हे गुन्हेगारीशास्त्र (क्रिमिनाॅलाॅजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पाॅलिसी) या विषयांचे नाॅर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. ते म्हणतात, या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार होणे आवश्यक आहे. एकदम निष्कर्ष काढणे बरोबर नाही. तसे न करता एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्याऱ्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसीसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती जेव्हा या घटनेची लगेच दखल घेते आणि पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती, इसीसच्या वतीने विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जाहीर करते, तेव्हा तर जणू आता शंकेला वावच उरलेला नाही, असे आपण समजून चालत आहोत. हा लेख म्हणजे या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, याचा नमुना ठरावा, असा आहे.
संरक्षण व शस्त्रास्त्र विषयाच्या तज्ञाचे मत - असाच दुसरा लेख संरक्षण व शस्त्रास्त्रे या विषयाचे तज्ञ टाॅमस डेव्हिस यांनी लिहिला आहे. हे एक सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी असून त्यांनी आपली मते मांडतांना म्हटले आहे की, शस्त्रास्त्र वापराबाबत सैन्यात जे नियम पाळले जातात, निदान त्यांचे जरी पालन करण्याचा आग्रह आपण सर्वसाधारण व्यक्तींचे बाबतीतही धरला तरी आॅर्लॅंडो सारखी हत्याकांडे होणार नाहीत. हे एका माथेफिरूचे कृत्य आहे, असे वाटते.
टाईम्सची संयमित भूमिका - ओर्लॅंडो हत्याकांड प्रकरणी ‘टाईम’ या जगविख्यात मासिकाची प्रतिक्रिया सर्वात परिपक्व मानली जाते. या मासिकाने आपल्या मासिकाचे मुखपृष्ठ काळ्या रंगात छापले असून त्यावर पांढऱ्या रंगात हत्याकांडात बळी पडलेल्या पन्नास स्त्रीपुरुषांची नावे एकाखाली एक अशी पानभर छापली आहेत आणि सोबत लाल रंगात प्रश्न उपस्थित केला आहे,‘ व्हाय डिड दे डाय?’ आतमध्ये या विषयाचे सविस्तर विवेचन करणारा लेख आहे. या प्रतिक्रियेचे अराजकीय व विचार करायला भाग पाडणारे स्वरूप दीर्घ काळ नजरेसमोर येत रहावे असे आहे. पण अमेरिकेतील निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे तर एरवीही असे गंभीर विचार, जर ते अतिरेक्यांच्या संबंधातले असतील तर, ते कुणाच्याही पचनी पडत नाहीत.
मतपेटीचे राजकारण- या प्रश्नाला वेगळे महत्त्व यासाठीही आहे की, डेमोक्रॅट पक्ष मुस्लिम व मेक्सिकन विस्थापितांबद्दल नरमाईची भूमिका घेतो कारण ते त्यांचे भरवशाचे मतदार आहेत, असा समज आहे व तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही. ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या त्या सगळ्या देशात मतपेढीचे राजकारण, मतपेढी उभी करणे, जोपासणे, तिला खूष ठेवणे हा प्रकार निरनिराळ्या स्वरूपात असतोच. कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात एवढाच कायतो फरक असतो. ‘मेरी कमीझ तेरी कमाझसे अधिक सफेद है’, एवढेच काय ते एक दुसऱ्याला म्हणू शकतो.
क्लिंटन फाऊंडेशनचे मुस्लिम दाते - क्लिंटन कुटुंबावर आणखीही एक आरोप आहे. क्लिंटन फाऊंडेशनला खनीज तेलाच्या भरवशावर श्रीमंत झालेले मध्यपूरवेतील बहुतेक देश व धनवंत भरघोस मदत करीत असतात. त्यातही सौदी कतारी व कुवेती लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे मुस्लिम दहशतवाद्यांबद्दल हे कुटुंब नेहमीच नरमाईची भाषा वापरते, असा आरोप आहे. हिलरी क्लिंटन यांचा पाकिस्थानकडे कल असतो, त्याचेही हेच कारण आहे, असे एरवीही होत असलेले आरोप व कुजबुज हे प्रकार आज निवडणुकीच्या काळात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेने ऐकू येत आहेत. ओबामा प्रशासनाने - म्हणजे डेमोक्रॅट प्रशासनाने- तर बेकायदा प्रवेश करणाऱ्या सर्व विस्थापित व स्थलांतरित यांची नागरिकत्व व/वा ग्रीन कार्डाबाबतची प्रकरणे (की ज्यात मेक्सिकन व मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे) तातडीने निकाली काढत आणली आहेत. आता ते त्यांचे भरवशाचे मतदार ठरणार हे निश्चित आहे. यामुळे रीतसर पद्धतीने नागरिकत्व व/वा ग्रीन कार्ड मिळवणार्ऱ्यांचा नंबर खाली घसरला आहे (दरवर्षी किती लोकांची प्रकरणे निकाली काढायची हा आकडा निश्चित असतो व त्यातला फार मोठा हिस्सा या लोकांना मिळाला आहे). इथला भारतीय समाज यामुळे ओबामा प्रशासनावर म्हणजेच पर्यायाने डेनोक्रॅट पक्षावर नाराज आहे. याची डेमोक्रॅट पक्षाला फारशी चिंता नाही. कारण भारतीय लोकांचा कल सामान्यत: रिपब्लिकन पक्षाकडे असतो, असे मानले जाते. अमेरिका पाकिस्थानला का चुचकारत असते, याचे रहस्यही यातच दडलेले आहे, असे मानतात. डेमोक्रॅट पक्षाची मतपेढीत अल्पसंख्यांक व आफ्रिकन अमेरिकन यांचा फार मोठा वाटा आहे, असे मानले जाते. याबाबत डेमोक्रॅट पक्षाचे आपल्या येथील काॅंग्रेस पक्षाशी साम्य दिसते. अर्थात मतपेढीची गणिते नेहमीच इतकी साध्या बेरीज वजाबाकीची नसतात. यात प्रसंग, व्यक्ती, तात्कालिक लाभ यासारख्या मुद्यांमुळे फरक पडतो. पण सध्यातरी या प्रश्नावरून ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावर मात केल्याचे चित्र आहे.
तर्क व राजकारण- दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, तरूण मतदार दिवसेदिवस ट्रंप यांच्याकडे अधिकाधिक संख्येत आकृष्ठ होत आहेत. त्यांचे अजब तर्कटही त्यांना भावते. हत्याऱ्याचे मुस्लिम अफगाणी पूर्वज दोन पिढ्या अगोदरच अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. मुस्लिमांना आश्रय देण्याचे धोरण वेळीच( म्हणजे तेव्हापासून) बदलले असते तर आज हे हत्याकांड झाले नसते, हा त्यांचा तर्कही मतदारांना पटतो आहे. वास्तवीक त्याच सुमारास अनेक स्थलांतरीत /विस्थापित अमेरिकेत येऊन स्थायिक झाले असतील आणि तेव्हापासून ते गुण्यागोविंदाने अमेरिकेत राहात व वावरत असतील. पण…..
द्विपक्षीय राजकारणावर परिणाम होईल का?- ट्रंप वाईट आहेत पण हिलरीही त्यांच्यापेक्षा चांगल्या नाहीत’, असे मानणारा फार मोठा वर्ग अमेरिकेत आहे. दोन्ही पक्षांनी या विषयाची दखल घ्यावी असा हा मुद्दा आहे. पण राष्ट्रीय संमेलनात गृहीत उमेदवाराच्या निवडीवर पक्षाचा शिक्कामोर्तब करण्याचा शिरस्ता बाजूला ठेवून त्यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या कुणाला देण्याचा विचार करण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या धुरिणांना शंभरदा विचार करावा लागणार आहे. ट्रंप यांचा स्वभाव बघता ते बंडखोरी करून स्वतंत्र उभे राहिले तर मतदारांचा फार मोठा वर्ग त्यांच्या बाजूने मतदान करील, अशी भीती या धुरिणांना वाटते आहे. हिलरी क्लिंटन या स्वार्थी, कारस्थानी, दीर्घद्वेषी आहेत, असे मानणारे लोक खुद्द त्यांच्या पक्षातही आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात कौल मिळवू, अशी जिद्द बाळगून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स हे तर कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यामुळे पडणारी संभाव्य फूट अमेरिकेतील आजवरच्या परंपरागत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाच्या प्रारंभ तर ठरणार नाही ना? याबाबत अजूनतरी कुणाचीही भविष्यवाणी समोर आलेली नाही. काळाच्या उदरात काय दडलेले आहे हे कोण सांगू शकतो? ते काहीही असले तरी मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे अमेरिकेतील राजकारण पार ढवळून निघत आहे हे मात्र नक्की

Comments
Post a Comment