यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक
यंदाची अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी होईल.या दिवशी मंगळवार आहे. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता.. अमेरिका आहे कशी? अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे व देशात ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही. बडी राज्ये कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटव्हज (जणू लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफरिप्रेझें...