अमेरिकन अध्यपदाची निवडणूक - हितोपदेश, सल्ला, इशारा आणि चिखलफेकही

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
२७२१, प्राईम रोझ लेन, नाॅर्थ, याॅर्क, अमेरिका
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
रिपब्लिकन पक्षाचे गृहीत उमेदवार(प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) श्री डोनाल्ड ट्रंप हे आपल्यालाच रिपब्लिकन पक्ष अधिकृत उमेदवार घोषित करणार असे गृहीत धरून चालले आहेत. जुलैच्या मध्यानंतर होऊ घातलेलेल्या राष्ट्रीय संमेलनात आपली उमेदवारी पक्की होणार असे मानून ते पुढची पावले टाकीत आहेत. मुख्य म्हणजे काहीही करून आपण प्रसिद्धीच्या झोतात कसे राहू हा त्यांचा सुरवातीपासूनचा प्रयत्न दुप्पट उत्साहात सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांनी प्रारंभापासूनच पकड जमवली असून त्यांच्याच्या बेछुट, बेलगाम, भडकावू व अडदांड भूमिकेवर अमेरिकन तरुणाई निदान आजतरी बेहद्द खूष आहे. महिलांविषयीच्या आपल्या काही वक्तव्यांवर झालेल्या टीकेची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने त्यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. अमेरिकन अध्यक्षाला न्यायाधिशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार असतो. आपण सर्वोच्च न्यायालयात कुणाकुणाची नेमणूक करू, हे त्यांनी जाहीर करून टीकाकारांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याता प्रयत्न केला आहे. ही अंतिम यादी नाही यात आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात, हे नमूद करून त्यांनी जनतेत आणखी कोण असू शकतात हा विषय हळूच सोडून दिला आहे. इजिप्तचे विमान कोसळले ते दहशतवाद्यांमुळे, असे त्यांनी ठोकून दिले आहे. चौकशीत बहुदा हाच निष्कर्ष निघेलही, पण ट्रंप यांनी हा प्रश्न आपल्यापुरता अगोदरच निकालात काढला आहे. सध्याची जनमानसाची स्थिती अशी आहे की, असा निष्कर्ष तुम्ही कशाच्या आधारे काढला, हे विचारण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखाशी आपण चर्चा करू असे विधान त्यांनी केले. यावर उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी हा अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील राजकारणाचा भाग आहे, असे म्हणून या विधानाची संभावना केली, हे जरी खरे असले तरी या वृत्ताने सोशल मीडियात व वृत्तसृष्टीत ट्रंप यांचे नाव पुन्हा एकदा झळकलेच. जागतिक वृत्तसृष्टीनेही या वृत्ताची कशी का होईना पण दखल घेतलीच. एनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळालीच.
मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला देश आहे. या देशातून अनेक लोक अमेरिकेत बेकायदा प्रवेश करीत असतात, तस्करीही होत असते. म्हणून या दोन देशात चीनप्रमाणे पण मेक्सिकोच्या खर्चाने एक अजस्त्र भिंत बांधली पाहिजे, असे विधान ट्रंप यांनी केले. अर्थातच मेक्सिकोने हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. आता ही भिंत बांधण्यासाठी तुम्ही पैसा कसा उभा करणार म्हणून लोक पृच्छा करू लागले, तेव्हा मात्र ट्रंप यांनी या विषयाबाबत मौन बाळगणे पसंत केलेले दिसते.
चलाख व चतुर ट्रंप - ट्रंप हे एक चलाख व चतुर व्यक्तिमत्त्व आहे. आपला सामना हिलरी क्लिंटन यांच्याशीच आहे, हे ते गृहीतच धरून चालले आहे. हिलरींना देशात काय किंवा देशाबाहेर काय प्रसिद्धीसाठी खास प्रयत्न करण्याची गरज नाही. गेली जवळजवळ तीन दशके देशांतर्गत राजकारणात व देशाबाहेरील राजकारणातही त्यांचे नाव सर्व परिचित व सुपरिचित आहेत. याउलट कालपर्यंतची आपली एक ‘धनदांडगा बिल्डर’ असलेली प्रतिमा पुसून, निदान धूसर करून, राजकीय सारीपटावर आपले नाव आणण्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील हे ते जाणून आहेत. धनदांडगा बिल्डर ते राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा खूप मोठा पल्ला आहे, हे ते जाणून आहेत. तसेच हिलरींच्या पतीची - बिल क्लिंटन यांची - महिलांच्या संबंधातली लफडी म्हणजे बलात्काराच प्रकार नाही का, अशी शंका उपस्थित करीत ते एकीकडे महिलांना चुचकारित आहेत तर दुसरीकडे प्रतिपक्षाची प्रतिमा डागाळावी असा प्रयत्न करीत आहेत. रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार ह्याची खात्री होताच ट्रंप यांना चेव त्यांनी हिलरींनाच धारेवर धरले आहे. त्यांनी हिलरींवर चौफेर टीका करायला सुरवात केली आहे. उर्जा, शस्त्रास्त्रे, आर्थिक नीती, आंतरराष्ट्रीय प्रश्न ह्याबाबत ते प्रश्नांचा भडीमार करत आहेत. तसा विचार केला तर नोव्हेंबर पर्यंत ओबामाच अध्यक्ष आहेत, पण हा मुद्दा ट्रंप यांच्याप्रमाणे माध्यमेही नजरेआड करीत आहेत. पण हे सर्व धोरणात्मक मुद्दे आहेत. ट्रंप यांनी हिलरींवर व्यक्तिगत हल्लाही चढवला आहे. शासकीय पदावरील व्यक्ती दोन प्रकारची ईमेल खाती वापरते. खाजगी ईमेल खाते खाजगी कामासाठी व शासकीय ईमेल शासकीय कामासाठी. हिलरी यांनी ही सीमारेषा पाळली नाही, म्हणून हिलरींवर ते ठपका ठेवीत आहेत. तसा हा मुद्दा जुना आहे. पण निवडणुकीचे वेळी परस्परांची जन्मकुंडली पासून सर्वच बाबींवर प्रतिपक्षी हल्ला चढवतो. हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे. हिलरींची भूमिका अशी आहे की, मी कोणतीही चूक केलेली नाही. याबाबतचे नियम नंतर स्पष्ट झाले आहेत. हे मात्र खरे आहे की, जर मी पुन्हा त्या काळात गेले/ जाऊ शकले तर पुन्हा अशी गल्लत करणार नाही. पण हे मढे काही नवीन मुद्दे उपस्थित करून वारंवार उकरले जात आहे.
हिलरींची सावध चाल- आतापर्यंत हिलरी क्लिंटन ट्रंप यांच्याबद्दल स्वत: मोजकेच बोलल्या आहेत. ट्रंप हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार नाहीत, त्यांच्या हाती अमेरिकेचे भवितव्य सोपविणे योग्य ठरणार नाही, अशी रोखठोक विधाने करून मग मात्र त्या स्वत: थांबल्या आहेत. ट्रंप यांच्या प्रत्येक टीकेला आपण उत्तर देऊच असेही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हे प्रकरण दिसते इतके साधे नाही. डेमोक्रॅट पक्षाच्या वतीने व हस्ते परहस्ते ट्रंप यांच्या विरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. पहिला बाॅंबगोळा आहे, ट्रंप यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतचा. ‘ट्रंप आपले टॅक्स रिटर्न्स जाहीर करा’, अशी मोहीम सुरू झाली आहे. याबाबत ट्रंप यांचे स्पष्टीकरण शंका निर्माण करते आहे. कधी ते म्हणतात,’ मी ते जाहीर करणारच आहे’, तर कधी म्हणतात ‘इतक्यात नाही, योग्यवेळी जाहीर करीन’, ‘मला ते जाहीर करायचेच आहे’, ‘ मी ते कधीही जाहीर करीन’, अशा त्यांच्या कोलांटउड्यांमुळे, या प्रश्नाबाबतचा संशय दिवसेदिवस अधिकाधिक दाट होत चालला आहे. याशिवाय क्लिंटन कुटुंबाशी जवळीक असलेल्या एका प्रसिद्धी यंत्रणेने लक्षावधी डाॅलर खर्चून ट्रंप विरुद्ध जाहिरारबाजी सुरू केली आहे.
हिलरी शांत का?- हिलरी आतापर्यंत शांत होत्या त्या प्रसिद्धीच्या झोतात फारशा येत नव्हत्या. याचे एक कारण असेही असेल की, त्यांचे नाव अमेरिकेत सर्वतोमुखी आहे. कुणी त्यांच्या विरोधात असतील तर कुणी त्यांच्या बाजूचे असतील. पण त्या राजकीय क्षितिजावर ट्रंपसारख्या एखाद्या धूमकेतूसारख्या अचानक उगवलेल्या नाहीत. ‘शी नीड्स नो इंट्रोडक्शन’, त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांचे समर्थक म्हणतात. म्हणून सध्या हिलरी तुलनेने शांत दिसत आहेत, याचे दुसरे कारण असेही असू शकते की, आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत स्पर्धाच आटोपलेली नव्ती. हिलरी यांचे पारडे चांगलेच जड होते तरी बर्नी सॅंडर्स त्यांना जोरदार टक्कर देत होते. अमेरिकेत जरी सगळेच पक्ष उजवे असले तरी बर्नी सॅंडर्स उजव्यातले डावे समजले जातात. त्यामुळे कामगार वर्गात तसेच मध्यम वर्गात ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण याला दुसरीही किनार आहे. अमेरिकेत साम्यवादाचा वास आलेला सुद्धा चालत नाही. असा हा दुधारी प्रकार आहे. पण हिलरी विरुद्ध बर्नी हा सामना आता अंतिमरीत्या लवकरच निकालात निघेल. राष्ट्रीय संमेलनात शिक्कामोर्तब व्हायची त्या वाट पाहत असतील. तोपर्यंत त्या आपला दारुगोळा बाहेर काढणार नाहीत, असे दिसते. ट्रंप यांच्या उतावळेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा गुण जसा उठून दिसतो तसाच तो त्यांच्या मरब्बीपणाचीही साक्ष पटवतो. तिसराही एक मुद्दा आहे. बराक ओबामा यांचे गेल्या निवडणुकीत प्रचार यंत्रणेचे कर्तेधर्ते असलेले स्टीव्ह शेल हे पक्षाचे कार्यकर्तेही आहेत. त्यांचे मत असे आहे की, ट्रंप यांना काय बोलायचे ते बोलू द्या. एकवेळ अशी येईल की, त्यांचे मुद्देच संपतील. मग आपण आपला दारूगोळा बाहेर काढू. ओबामा यांचीच धोरणे आपण पुढे चालू ठेवू, एवढेच सध्या हिलरींनी म्हटले आहे. हे विधान वरवर दिसते तेवढे साधे नाही.
ओबामा केअर या निवडणुकीत मुद्दा नको - ‘ओबामा केअर’ ही गरीब व गरजवंतांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरवणारी योजना आहे. तिला रिपब्लिकन पक्षाने एकेकाळी उघड व छुपा विरोध केला होता. ही योजना आता अमलात आली आहे. आता या विषयावर कुणीच बोलत नाही. याचे कारण असे की, या योजनेचा फायदा मिळालेल्यांची एक मतपेढी तयार झाली आहे. तिला कुणीच दुखवायला तयार नाही. पण या योजनेला विरोध करणारेही खूप होते. त्यांचा विरोध मावळावा, म्हणून या योजनेचा आज कुणी पुरस्कारही करत नाही( तसा करण्याची आवश्यकताही नाही, कारण ती योजना आता अमलात आहे) म्हणून हा विषय ‘नाॅन इश्यू’ व्हावा,थंड्या बस्त्यात जावा हे उभयपक्षी सोयीचे आहे. पण ओबामांचीच धोरणे आपण पुढे चालवू म्हणून हिलरी यांनी स्पष्ट असे काहीही न सांगता आपल्या मनात काय आहे, ते जाणवून दिले आहे.
सध्या हिलरी स्वत: जरी बोलत नाहीत. ट्रंप यांच्या आक्षेपांना डेमोक्रॅटिक पक्षच उत्तर देतो आहे. निवडणूक ८ नोव्हेंबरला म्हणजे तशी अजून दूर आहे. त्यामुळे फार घाई करून चालणार नाही. म्हणून सध्यातरी फारसा विरोध न करता ट्रंप यांच्या प्रचाराचा डोलारा तसाच उभा राहू द्यायचा आणि योग्यवेळ येताच आपल्या भात्यातील बाण बाहेर काढायचे, असे डेमोक्रॅटिक पक्षाने ठरविलेले दिसते. निकोलस बर्नसिस हे हाॅवर्ड विद्यापीठातील एकेकाळी प्राध्यापक होते. त्यांची विशेषता ही आहे की, ते रिपब्लिकन व डेमोक्रॅट या दोन्ही राजकीय पक्षांच्या कारकिर्दीत सेक्रेटरी आॅफ स्टेट( मंत्रीपदावर) राहिले होते. हे सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्हिझिटिंग फेलो म्हणून कार्यरत आहेत. प्रचारतंत्रातले असलेले मुरब्बी अशी त्यांची ओळख आहे. हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्याकडे आपल्या प्रचार मोहिमेची सूत्रे सोपविली आहेत.
उमेदवारांना हितचिंतकांचा हितोपदेश डोनाल्ड ट्रंप - डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे व हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाचे गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांच्याविषयी वृत्तपत्रात रोज काहीना काही मजकूर येत असतो.
ट्रंप हे कज्जेदलालीत प्रथम क्रमांकावर आहेत. ३५०० खटल्यांपैकी काही ट्रंप यांनी दाखल केलेले तर काही त्यांच्यावर दाखल झालेले खटले आहेत. त्यांच्यावर खटले दाखल करणाऱ्यात काही त्यांच्या उद्योगातले वेटर, चाकर यासारखे लोक आहेत. काहींना पगार मिळालेला नाही, काहींना कमी मिळाला, काहींचा पगार कापला गेला अशा तक्रारी आहेत. मी कष्टकऱ्यांचा कैवारी आहे, अशी त्यांची भूमिका असतांना हे कसे, असा प्रश्न त्यांना विचारला असता खांदे उडवून ते म्णाले की, त्यांनी कामचुकारपणा केला असेल, त्यांचे काम असमाधानकारक असेल तर मी काय करणार?
मेक्सिकन जज पक्षपाती असू शकतो, असे म्हणून तुम्ही न्यायव्यवस्थेवरच शंका घेत नाही का, असे विचारताच ते म्हणाले की, माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले.मी मेक्सिकोवर टीका करीत असल्यामुळेमेक्सिकोमधील लोकांचा माझ्यावर राग असेल, असे मी म्हटले होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मेक्सिकन लोकांबद्दल मी असे बोललो नव्हतो.
ट्रंप यांना अनेकांनी हितोपदेशही केला आहे. यापुढे तरी जिभेवर ताबा ठेवत जा. अध्यक्षपदाची निवणूक ही सोपी गोष्ट नाही. एक सुसज्ज, सुरळीत चालणारी व वंगण घातलेली प्रचार यंत्रणा उभारण्यावर भर द्या. आतापर्यंत ठीक होते पण यापुढे नुसत्या घोषणा करून भागणार नाही. यापुढे चर्चेच्या फैरी झडणार आहेत. त्या दृष्टीने अभ्यास व तयारी करावी लागेल.पक्षांतर्गत निवडणुकीत प्रतिस्पर्ध्याना उद्देशून बेताल विधाने केली. तेव्हा ती कामालाही आली. आता तसे करून चालणार नाही.
हिलरी क्लिंटन - हिलरींनाही सल्ला देणारे खूप आहेत. ट्रंप व समर्थकांचा तुमच्यावर आरोप आहे की, तुम्ही दीर्घद्वेषी, हट्टी व कारस्थानी आहात, हे म्हणणे तुम्हाला खोटे ठरवायचे आहे. जणू या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे वर्णन, एक धाराची महिला, मनात कणव असलेली महिला व अमेरिकेची पहिली महिला अध्यक्ष या नात्याने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवू शकेल अशी महिला या शब्दात केले आहे.
हिलरींना अनेक हितचिंतकांना हितोपदेश करतांना म्हटले आहे की, तुमच्यावर सतत प्रकाश झोत असतो, त्यामुळे लोक तुम्हाला लोक पाहू शकतात, तुमची भाषणेही लोक ऐकत असतात, पण म्हणून केवळ एवढ्याने जवळीक निर्माण होणार नाही. ट्रंप यांच्या बोलण्याने अमेरिकन तरुणाई प्रभावित झाली आहे. तिला आपल्याकडे वळवण्याचे काम तुम्हाला यशस्वी करायचे आहे. आता पर्यंत ट्रप यांना उत्तर देण्याचे काम इतरांवर सोपवले, इतपर्यंत ठीक आहे. यापुढे त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तरे तुम्हालाच द्यायची आहेत, हे लक्षात असू द्या.
जिद्दी बर्नी सॅंडर्स - हिलरी यांनी निर्णायक मते मिळवून गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट म्हणून यश संपादन केल्यावर अध्यक्ष ओबामा त्यांना आपला पाठिंबा जाहीर करूनच थांबले नाहीत तर त्यांनी हिलरींचे नजीकचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅंडर्स यांना आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयासाठी आपण एकोप्याने प्रयत्न करू या, असे आवाहन करीत तीनदा भेट घेतली. पण बर्नी सॅंडर्स बधले नाहीत. पक्षांतर्गत निवडणुका (प्रायमरीज) होत असतांना अध्यक्ष ओबामा व उपाध्यक्ष ज्यो बिडेन हे खरोखर तटस्थ राहिले याबद्द्ल त्यांचे आभार मानत त्यांनी माघार स्वीकारण्यास सपशेल नकार दिला.जुलै महिन्यात शेवटीशेवटी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्यावेळी आपण पुन्हा एकदा कौल घेऊ असे म्हणत त्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरचा आपला दावा कायम ठेवला आहे.

Comments
Post a Comment