अमेरिकेत धार्मिक सौहाद्य कसे निर्माण होईल?

वसंत गणेश काणे
ग्रींगग्रीच हे एक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते असून अमेरिकेच्या हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजचे स्पीकर राहिलेले आहेत. डोनाल्ड ट्रंप उपाध्यक्षपदासाठीचा जोडीदार म्हणून आपली निवड करतील असा त्यांचा कयास होता, पण ट्रंप यांनी इंडियाना राज्याचे गव्हर्नर माईक पेन्स यांची निवड केली असून क्लिव्हलंड येथील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या निवडीची रीतसर घोषणा होईल. फ्रान्समधील नीस येथे मोहम्मद नावाच्या ट्रक ड्रायव्हरने स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा उद्घोष करण्याच्या निमित्ताने एकत्र झालेल्या व तो कार्यक्रम आटोपून परत फिरलेल्या पादचाऱ्यांना ट्रकखाली चिरडत दोन किलोमीटर अंतर कापल्याची थरकाप उडवणारी बातमी जगभर पसरली. यानंतर ग्रींगगीच यांनी यांनी टिप्पणी केली की, मुस्लिम पार्श्वभूमी असलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्यात यावी व तो शरीयतला अनुसरून वागत असेल तर त्याची सरळ हकालपट्टी करावी. यावर एकाने म्हटले की, मोहम्मद कुठे शरीयत पाळत होता? तो तर शरीयतनुसार निषिद्ध ठरणाऱ्या ड्रग्जचे सेवन करीत असे. मुस्लिम जीवन मूल्ये व जीवन पद्धतीनुसार किती अमेरिकन मुस्लिम जीवन निर्वहन करतात याबद्दल माहिती नसून सुद्धा अमेरिकन लोक मुस्लिमांकडे संशयाने पाहत असतात. त्यांचे मत प्रत्यक्ष अनुभवावर नाही तर वृत्तसृष्टीतील माहितीवरून बनलेले असते. अनेक तर मुस्लिमांच्या संपर्कातही नसतात, त्यांच्याशी बोललेलेही नसतात. तरीही दिवसेदिवस अमेरिकन लोकांचे मत मुस्लिमांबद्दल अधिकाधिक प्रतिकूल होत चालले आहे, असे एका धार्मिक मतचाचणीत आढळून आले आहे.
एक महत्त्वाची नोंद - ५६ टक्के अमेरिकन लोकांना इस्लामी जीवन मूल्ये व जीवन पद्धती विचित्र वाटत असली तरी त्यांचा हिंसेशी संबंध असावा, असे त्यांना वाटत नाही. याउलट तब्बल ६८ टक्के लोकांना वाटते की हिंसक लोक आपल्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी धर्माचा वापर करतात. फक्त २२ टक्के लोकांना असे वाटते की, काही धर्म हिंसेचा पुरस्कार करतात.
असे बनते जनमत - ज्या लोकांशी आपला कधीही संपर्क नाही त्यांच्याबाबत अमेरिकन लोक आपले मत बनवीत आहेत. अमेरिकेच्या लोकसंख्येत मुस्लिमांची टक्केवारी फक्त एक टक्का असून व काही मोजक्या शहरांमध्येच त्यांची संख्या बरीच दाट आहे. या ठिकाणी तणाव निर्माण झाले आहेत. पण हा प्रकार इथल्यापुरता मर्यादित राहत नाही. तर दर दहा अमेरिकन लोकांपैकी ७ लोक असे आहेत की, ज्यांनी आयुष्यात कधीही मुस्लिमांशी संभाषण केलेले नसते, मग त्यांची ओळख असणे तर दूरच राहिले. ११ सप्टेंबरपूर्वी बहुतेक अमेरिकन लोकांच्या मनात मुस्लिमांबद्दल कधीही कोणतेही अनुकूल वा प्रतिकूल विचार आले नव्हते. त्या नंतरही अमेरिकेचे तत्कालीन रिपब्लिकन अध्यक्ष जाॅर्ज बुश जोर देऊन म्हणाले होते की आमचे काही इस्लामशी वैर नाही. याच मुद्द्यावर हिलरी क्लिंटन जोर देत असतात. पण आज परिस्थती बदलली आहे. रिपब्लिकन नेत्यांना हा युक्तिवाद मान्य नाही.
पण जसजसे दिवस जात होते तसतसे अमेरिकन जनमत त्यांच्यापेक्षा संस्कृती व धर्मापेक्षा वेगळ्या असलेल्या संस्कृती व धर्माबद्दल अधिकाधिक प्रतिकूल होत गेले. इतर कुणापेक्षा प्राॅटेस्टंट लोकाना असे वाटत होते की, अध्यक्षांनी इस्लामी अतिरेकाबद्दल अधिक कडक भूमिका घ्यावी मग त्यासाठी इस्लामवर टीका करावी लागली तरी चालेल.
अल्पसंख्यांक घटकापैकी एखाद्याबद्दल काही अवांछनीय माहिती कळताच तिचा परिणाम सर्व समाजाची भूमिका बदलण्यास कारणीभूत व्हावा याची प्रचिती घेण्यासाठी फार दूर जावयास नको. समलिंगींकडे पाहण्याचा इस्लाममतधारकांचा दृष्टीकोन अनुदार आहे. हे कळताच समलिंगींकडे पाहण्याचा अमेरिकनांचा दृष्टीकोन किती वेगाने बदलला तेच पहाना. त्यांच्यातील विवाहाला मान्यता देण्यापर्यंत मजल गेली. मोठमोठ्या उत्सवमूर्ती, खेळाडू, शेजरीपाजारी आपल्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलू लागले. जून २० जून २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह वैध ठरवताच १० पैकी ९ अमेरिकन म्हणू लागले की, त्यांच्याही परिचितात समलिंगी आहेत. त्याच्यांत व इतरात आपुलकीचे संबंध आहेत. अशी जवळीक त्यांच्या मनात मुस्लिमांबद्दल मात्र नाही. उलट अंतर आहे, ते वाढवण्याचे काम माध्यमांनी केले. इसीसची पशुतेचे दर्शन घडवणारी शिरच्छेदाची उदाहरणे, उतावीळ धमक्या, पॅरिसवरील हल्ले यांनीच इस्लामविषयक अमेरिकन वृत्ते व्यापलेली आढळतात. म्हणून ५४ टक्के अमेरिकनांनी १०,००० सिरीयन निर्वासिंतांना कडक छाननीनंतरही प्रवेश देण्यास विरोध दर्शविला होता. अनेकांना नकाशात सिरीया कुठे आहे, हेही दाखवता येणार नाही. त्यांच्या हिशोबी सिरीया म्हणजेच मध्यपूर्व आणि मध्यपूर्व म्हणजेच मुस्लिम. पण लोकांवर सत्य लपवण्याचाही विपरीतच परिणाम होतो. फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या पाशवी कृत्याचे वृत्ताचे शीर्षक होते, ‘ट्रकने अनेकांना चिरडले’. या पाशवी कृत्याचे कर्तृत्त्व एका ट्रककडे देण्याचा खटाटोप या निमित्ताने झाला, त्याचा नेमका उलटा परिणाम झाला. वाचकांनी ट्रकचालकाचा शोध घेतला. पुढच्यावेळी अशी बातमी पुन्हा झळकली तर वाचक शोध घेण्याच्या खटाटोपात न पडता एकदम निष्कर्षाप्रत पोचतील.कदाचित यावेळी या कृत्याचे कर्तृत्त्व दुसऱ्या व्यक्ती किंवा वृत्तीकडेही असू शकेल.सत्याला सामोरे जाणे हाच सत्याचा विपरित परिणाम कमी करण्याचा प्रभावी व कायमस्वरूपी उपाय असतो. सत्य दडपणे हा नव्हे.
जोपर्यंत अमेरिकनांच्या काय किंवा आणखी कोणाच्या काय आवडीचे आणि ओळखीचे लोक मुस्लिम असणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे मुस्लिमांबद्दलचे मत माध्यमांच्या वृत्तानुसारच ठरणार, हे उघड आहे. त्यांची शीर्षके मुद्दाम चुकीची, अपुरी, दिशाभूल करणारी, लपवालपवी करणारी असतात, असे जर वाचकांना वाटले तर ते सत्य जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट घेणार नाहीत. जुन्या अनुभवाच्या आधारे एकदम निष्कर्षाप्रत पोचतील. म्हणून सत्याला सामोरे जा. उभयपक्षी समंजसपणा व मानसिक उदारता कशी निर्माण होईल ते पहा. विशेषत: सर्व धर्मांनी म्हणजेच धर्मांच्या मुखंडांनी ही भूमिका स्वीकारावयास हवी की, ईश्वरप्राप्तीचे एकापेक्षा अधिक मार्ग असू शकतात आणि प्रत्येकाला आपला मार्ग चोखाळण्याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे.

Comments
Post a Comment