इलेक्टोरल काॅलेज

अमेरिकन संसदेची दोन सभागृहे आहेत. एक हाऊस (हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज ) व दुसरे सिनेट.
हाऊसमध्ये प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्त्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे. त्याला हाऊसमध्ये ५३ प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. १९११ सालची लोकसंख्या गृहीत धरून केलेल्या हिशोबानुसार प्रत्येक राज्याच्या हाऊसमधील प्रतिनिधींची संख्या ठरवण्यात आली असून सध्या हाऊसची संख्या ४३५ इतकी आहे.
सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोन सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य लहान असो वा मोठे. अमेरिकेत आजमितीला ५० राज्ये आहेत. त्यामुळे ५० ला दोनने गुणून येणारी संख्या ही सिनेट मधील सिनेटरची संख्या१०० असते. अशाप्रकारे जोपर्यंत राज्यांची संख्या ५० आहे तोपर्यंत सिनेटर्सची संख्या १०० व राज्याच्या लोकसंख्येचा विचार करण्यासाठी  १९११ सालची त्या त्या राज्याची संख्या हिशोबात घ्यायची हा निकष कायम आहे तोपर्यंत हाऊसमधील प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या ४३५ कायम राहील.
इलेक्टोरल काॅलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्याने ४३५+१००=५३५ ही संख्या येत असतांना इलेक्टर्स ५३८ कसे? नेब्रास्का व मेन या राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. अशा प्रकारे ज्या उमेदवाराला २७० मते मिळतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो.

प्रत्येक राज्याची इलेक्टर्स निवडण्याची पद्धत वेगळी असते. यांचे नामनिर्देशन पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात करतात. पक्षाचे अनुभवी व एकनिष्ठ कार्यकर्ते,पक्षाचे राज्य पदाधिकारी, अध्यक्षीय उमेदवार वा पक्षाशी जवळीक असलेले व्यक्ती यातून राज्यनिहाय इलेक्टर्स निवडले जातात. जसे कॅलिफोर्नयातून ५५ उमेदवारांची यादी प्रत्येक पक्ष तयार करील. अध्यक्षीय उमेदवारांच्या नावाखाली यांचा नावे असतात किंवा नसतात. २०१२ मध्ये सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये ओबामा व राॅम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात. या नियमाला ‘विनर टेक्स आॅल’ असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य या किंवा त्या उमेदवाराकडे जाते.
नेब्रास्का व मेन या दोन राज्यांच्या बाबत वेगळा नियम आहे. नेब्रास्काला तीन  रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर मेनला दोन रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे नेब्रास्काला ३+२=५ इलेक्टर्स मिळायला हवेत तसेच मेनला २+२=४ इलेक्टर्स मिळायला हवेत

Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम