क्लिंटन फाऊंडेशनच्या निमित्ताने निर्माण झालेले नैतिक प्रश्न

वसंत गणेश काणे
क्लिंटन फाऊंडेशनमध्ये हिलरी, त्यांचे पती बिल व कन्या चेल्सिया यांचे हितसंबंध गुंतलेले असून त्यात परस्परविरोध असू शकतात हे मान्य करून हिलरी क्लिंटन यांनी घोषणा केली आहे की, निवडून आल्यास त्या अभूतपूर्व स्वरुपाची पावले उचलतील. पण एक बाब नजरेआड करतायायची नाही की, एका अवाढव्य धर्मादाय निधीचे व्यवस्थापन आणि घटनादत्त अध्यक्षीय कर्तव्ये यात यात त्या निकोप परस्परसंबंध कसे राखू शकतील.
या मुद्याचे महत्त्व यासाठी आहे की सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर असतांना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा अवाढव्य निधी उभारला आहे. मुळात माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी या नात्याने त्या आजही माजी प्रथम मानांकित महिला (फाॅर्मर फर्स्ट लेडी) आहेतच. शिवाय सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर असतांना त्यांनी क्लिंटन फाऊंडेशनच्या देणगीदारांना अवाजवी सवलती दिलेल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या हाऊस ओव्हर साईट कमेटीने या विषयाच्या चौकशीला प्रारंभ केला आहे. या चौकशीत काहीही निष्पन्न झाले तरी उद्या अध्यक्ष झाल्यावर क्लिंटन फाऊंडेशनच्या देणगीदारांचा प्रश्न कायम राहणारच आहे.
मी अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर काही अगदी वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात, याचे भान ठेवून आम्ही अभूतपूर्व स्वरुपाची उपाययोजना योजून ठेवली आहे.
काय असू शकेल ही उपाययोजना? एक म्हणजे क्लिंटन फाऊंडेशन हे नाव बदलणे. दुसरे म्हणजे उद्योगपती व परकीय देणगीदार यांचे कडून देणग्या घेणे बंद करणे. तिसरे म्हणजे सध्या सुरू असलेले आंतरराष्ट्रीय कार्यक्रम थांबवणे. हे उपाय बिल क्लिंटन यांनी ब्लाॅगवर टाकले आहेत. असे जर केले तर क्लिंटन फाऊंडेशनचे बाळसे निम्याने उतरेल. कारण येणाऱ्या देणग्यांपैकी निदान निम्या देणग्या परदेशातून येत असतात.
सेक्रेटरी आॅफ स्टेट पदावर असतांना हिलरी क्लिंटन यांनी ज्या १५४ लोकांशी ईमेलने संपर्क केला होता, त्यातील ८५ लोकांकडून एकूण १५६ दशलक्ष डाॅलरची देणगी क्लिंटन फाऊंडेशनला मिळालेली दिसते. पण ही बाब हिलरी क्लिंटन यांनी नाकारली आहे. ‘धूर खूप आहे, हे मान्य पण आग मात्र नाही’. मी ज्यांच्या ज्याच्या भेटी घेतल्या त्यापैकी कुणी डोनर असतील कुणी नसतील’.
आधुनिक काळात अमेरिकेचे जे जे अध्यक्ष झाले त्या प्रत्येकाचे व्यावसायिक हितसंबंध होतेच. काहींनी त्यांचे व्यवस्थापन त्रयस्थ व्यक्तीकडे सोपवले किंवा ती रकम म्युच्युअल फंड किंवा अर्थखात्याच्या बाॅंड्समध्ये गुंतवली. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्या हेच केले आहे.तर डोनाल्ड ट्रंप म्हणतात की, मी सर्व व्यवहार मुलांच्या हाती सोपवून मोकळा होणार आहे.
धर्रादाय रकम अशी एका व्यक्तीकडे सोपवता येते का? येईल का? क्लिटन फाऊंडेशनचा व्याप व पसारा आज खूप मोठा असला तरी, मूळ उद्देश एक चांगले सार्वजनिक वाचनालय काढणे, हा उद्देश होता.
डोनाल्ड ट्रंप यांचेही स्वत:चे फाऊंडेशन असून तो पैसा अशा व्यक्तीकडून मुख्यत: आलेला आहे की जी व्यक्ती मोक्याच्या व सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणाऱ्या बाबी मिळवून देण्याचा व्यवसाय करते. या निमित्ताने ‘किसकी कमीज कम मैली है’, एवढाच कायतो प्रश्न उरतो का?
निर्माण झालेले हे दोन मुद्दे तसे वेगळे असले तरी त्यात एक साम्य जरूर आहे. क्लिंटन फाऊंडेशन व ट्रंप आॅर्गनायझेशन ह्या दोन्हींचे त्या त्या कुटुंबांशी जवळचे संबंध आहेत. स्थापनकर्त्यांमुळे त्यांनी येथवर मजल मारली आहे. खाजगी आणि राजकीय हितसंबंध वेगळे करणे दोघांनाही कठीण झाले आहे.
या दोन्ही भावी अध्यक्षांचे आपापल्या प्रकल्पांशी असलेले संबंध अज्ञात आहेत. क्लिंटन कुटुंबाचा क्लिंटन फाऊंडेशनशी भावनिक संबंध असून त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. मानसिक दृष्ट्याच नव्हे तर भावनिक दृष्ट्याही हा प्रकल्प त्यांना जीव की प्राण आहे. पण तरीही क्लिंटन कुटुंबानेच फाऊंडेशनशी असलेले संबंध तोडून टाकले पाहिजे. जसे जिमी कार्टर यांनी केले. मानवतावादी दृष्टीकोनातून काम करण्याचे हेतूने ते कार्टर सेंटर स्थापन झाले होते.
क्लिंटन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डोना शलाला यांना हा सर्व खटाटोप अनावश्यक व बेजबाबदारपणाचा वाटतो. लोकहिताची / परोपकाराची कामे कशी चालतात, याकडे टीकाकारांचे दुर्लक्ष झालेले आहे. दुसरे असे की, हितसंबंधातील परस्परविरोधाचे कायदे अध्यक्षांना लागू होत नसल्यामुळे, डोनाल्ड ट्रंप काय किंवा हिलरी क्लिंटन काय, आपापल्या या संघटनांपासून संबंधविच्छेद करण्याचे काहीएक कारण नाही. दोघांनाही काहीही करण्याचे कारण नाही. म्हणजे हेतर असे झाले की, ‘खोदा पहाड पर चुहा भि न निकला।’
माजी रिपब्लिकन अध्यक्ष जाॅर्ज बुश यांचे कायदेशीर सल्लागार मात्र म्हणतात, आवश्यक असो वा नसो, त्यांच्यावरील टीका कितीही अनुचित असो, हिलरी क्लिंटन यांनी क्लिंटन फाऊंडेशन पासून दूर राहणे हे त्यांच्या व देशाच्या हिताचे आहे. यामुळे मूळ प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडेच वेधले जाते आहे. जाॅर्ज बुश हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार आहेत. पुन्हा एकदा नोंदवले पाहिजे माजी रिपब्लिकन अध्यक्ष म्हणतो आहे की, मी डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार आहे.
एकूण काय तर निवडणुकीत पराभव पत्करणे किंवा जिंकल्यास पुढची चार वर्षे टीकेचे घाव सहन करणे हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत.

Comments
Post a Comment