अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक
अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक
वसंत गणेश काणे
अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या ८ तारखेला होऊ घातलेली असून सध्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडत आहेत आणि त्यांचीच धामधूम कानावर येत असते. सुरवातीला प्रत्येक पक्षात डेलिगेट्सची निवडणूक पार पडते आहे. यात कोणाच्या बाजूचे किती पाठिराखे याबाबतच्या वार्ता ठराविक कालांतराने समोर येत असतात.
अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चुरस (डेमोक्रॅट)
डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण ४७६३ डेलिगेट्स आहेत. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी २३८२ डेलिगेट्स मिळणे गरजेचे आहे. हिलरी क्लिंटन यांना आतापर्यत १७५६ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यापैकी १२८७ हे वचनबद्ध प्रतिनिधी ( प्लेज्ड डेलिगेट्स) आहेत. हे प्रतिनिधी उमेदवार निश्चित करण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन जेव्हा होईल तेव्हा क्लिंटन यांनाच मत देतील. याउलट ४६९ हे खास प्रतिनिधी (सुपर डेलिगेट्स) असून त्यांची नियुक्ती डेमोक्रॅट पक्षाने केलेली आहे. हे बांधिल नसतात. हे आज जरी हिलरी क्लिंटन सोबत असले तरी डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात हिलरी क्लिंटन किंवा बर्नी सॅंडर्स यापैकी किंवा आणखी कुणालाही मत देऊ शकतील.
याउलट बर्नी सॅंडर्स यांना आतापर्यत १०६८ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यापैकी १०६८ हे वचनबद्ध प्रतिनिधी ( प्लेज्ड डेलिगेट्स) आहेत. हे प्रतिनिधी उमेदवार निश्चित करण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रीय संमेलन जेव्हा होईल तेव्हा सॅंडर्स यांनाच मत देतील. याउलट ३१ हे खास प्रतिनिधी (सुपर डेलिगेट्स) असून त्यांची नियुक्ती डेमोक्रॅट पक्षाने केलेली आहे. हे बांधिल नसतात. हे आज जरी बर्नी सॅंडर्स सोबत असले तरी डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात बर्नी सॅंडर्स किंवा हिलरी क्लिंटन यापैकी किंवा आणखी कुणालाही मत देऊ शकतील.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या यापुढे होऊ घातलेल्या प्रायमरीजमध्ये १९४१ प्रतिनिधी निवडायचे असून ते कोणाला पसंती देतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बर्नी सॅंडर्स यांनी हिलरींशी आतापर्यंत जी टक्कर दिली आहे त्यात या दोघातील फरक कमी कमी करत करत आता हा फरक फक्त ६९८ इतकाच ठेवला आहे. उरलेल्या १९४१ प्रतिनिधींपैकी जास्तीत जास्त प्रतिनिधी मिळवण्यासाठी या दोघातील चुरस आता वाढणार हे नक्की पण हिलरी क्लिंटन यांची आजची ६९८ ची बढत लहान नक्कीच नाही.
आपल्याकडे जशी उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारखी बडी राज्ये आहेत, तशीच अमेरिकेत कॅलिफाॅर्निया, टेक्सास, न्यूयाॅर्क, फ्लोरिडा, पेन्सिलव्हॅनिया अशी बडी राज्ये आहेत. यापुढे यासारख्या कोणत्या राज्यात कोण किती बढत घेतो, यावर या दोन उमेदवारांचे उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. क्लिंटन व सॅंडर्स यांच्यातला मतातला फरक कमी झाला असला तरी अजूनतरी क्लिटन यांचेच पारडे सतत जड राहिले असून, पारडी वरखाली, म्हणजे कधी क्लिंटन तर कधी संडर्स, अशी हेलकावे खातांना दिसलेली नाहीत. म्हणूनच कदाचित सध्यातरी हिलरी क्लिंटन किंचितही विचलित न होता पुढच्या योजनांवर लक्ष केंद्रित करतांना दिसत आहेत.
अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चुरस (रिपब्लिकन)
रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ डेलिगेट्स आहेत आणि उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी १२३७ डेलिगेट्स मिळणे गरजेचे आहे. डोनाल्ड ट्रंप यांना आतापर्यंत ७५५ प्रतिनिधींचा पाठिंबा मिळालेला आहे. आणखी ४८२ प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला तर उमेदवारी मिळण्यासाठी आवश्यक असलेला १२३७ हा जादुई ते गाठू शकतील व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरू शकतील. बेताल वक्तव्ये व अल्पसमज यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रंप यांनी महिलांबद्दल अशीच बेताल व अपरिपक्वता दाखवणारी विधाने केल्यामुळे जनमतात नाराजी वाढली आहे. विशेषत: महिलावर्ग तर त्यांच्याविरुद्ध खवळून उठला आहे. यावर उतारा म्हणून त्यांच्या पत्नीने पतिपरायणतेचा परिचय देत बरीच सारवासारव केली व पतीचे गोडवेही गायले आहेत. त्यांचा कितपत परिणाम होतो ते यथावकाश दिसेलच.
रिपब्लिकन पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार टेड क्रुझ यांना आतापर्यंत ५१७ प्रतिनिधी मिळाले असूनआणखी ७२० प्रतिनिधी मिळाल्यास ते रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठीचा १२३७ हा जादुई आकडा पार करू शकतील.
जाॅन कसिच हे तिसरे उमेदवारही अजून रिंगणात आहेत पण त्यांना आतापर्यंत फक्त १४४ च प्रतिनिधी मिळाले असून १०९३ प्रतिनिधी मिळणे बाकी आहे. पण आता एवढ्या प्रतिनिधींची निवड करायला तेवढ्या जागी निवडणूक व्हायचेच उरलेले बाकी राहिलेले नाही. निवडणूक आता फक्त १०५६ जागीच होणारआहे. या सर्व जागा जाॅन कसिच यांनाच मिळतील असे जरी गृहीत धरले ( जे अशक्य आहे) तरी (१०९३-१०५६=) ३७ जागा त्यांना कमी पडतील. अशा परिस्थितीत एक प्रकार होऊ शकतो व असे प्रकार अमेरिकेत होतातही, तो प्रकार हा की, जाॅन कसिच यांनी माघार घेणे व आपले १४४ प्रतिनिधी टेड क्रुझ यांच्या पारड्यात टाकणे. असे झाले तरच टेड क्रुझ डोनाल्ड ट्रंप यांना निर्णायक लढत देण्याच्या शक्यतेत येऊ शकतील. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे धुरीण व समंजस हितचिंतक एडीचोटीचे/ निकराचे प्रयत्न करतील. ही सर्व कागदावरची व ठोकळमानाची उदाहरणे आहेत. कागदावर दिसणारी बेरीज प्रत्यक्षात उतरतेच असे नाही हा काही आपलाच अनुभव नाही.
दोन्ही पक्षांचे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरण्याचाच विचार केला तर घोडामैदान जवळ आले आहे. पण खरा सामना क्लिंटन आणि सॅंडर्स यांच्यातला विजेता/विजेती व ट्रंप आणि क्रुझ यांच्यातला विजेता यांच्यात होणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या उत्कंठेला आवर घालावा, हेच चांगले.

Comments
Post a Comment