भिंत व वेट फूट, ड्राय फूट पाॅलिसी

भिंत व वेट फूट, ड्राय फूट पाॅलिसी
मेक्सिको व अमेरिका यांच्यामधली २००० मैल लांबीची सीमा( नक्की आकडा - १९८९ मैल) कुठे शहरी भागातून, कुठे अनुलंघनीय टेकड्यांमधून, कुठे उजाड वाळवंटातून तर कुठे  कोलोराडो व रिओग्रॅंड सारख्या खळाळत्या विस्तीर्ण नद्यांची  पात्रे ओलांडत अमेरिकेतील चार राज्यांना स्पर्श करीत जाते. एकूण तीनशे तीस चेक पोस्ट असली तरी कायदेशीर रीत्या दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या हजारो मेक्सिकन नागरिकांशिवाय निदान दुपटीने बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्यांमुळे अमेरिका बेजार झाली आहे. कारण कायदा व सुरक्षा, शिक्षण, निवास याबाबतच्या समस्या निर्माण होत आहेत. यथावकाश हे नागरिकत्व प्राप्त करतात. डेमोक्रॅट पक्ष या प्रवेशाकडे कानाडोळा करतो. त्यामुळे ही त्या पक्षाची मतपेढी(व्होट बॅंक) झाली आहे. स्थानिक नागरिक नाराज असून ते रिपब्लिकन पक्षाकडे वळले आहेत. विचित्र समस्या आहे. डोनाल्ड ट्रंप दोन हजार मैलांची ओलांडता येणार नाही अशी भिंत, तीही मेक्सिकोच्या खर्चाने बांधायची म्हणतात. एक छदाम देणार नाही, अशी मेक्सिकोची टेटर भूमिका आहे. या प्रश्नाची संवेदनशीलता इतकी आहे की युक्तीप्रयुक्तीने डोनाल्ड ट्रंप यांनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक निटो यांची ओपचारिक भेट घेऊन हस्तांदोलनाचा कार्यक्रम घडवून आणताच मेक्सिकन लोकांनी त्याला फक्त बदण्याचेच काय ते बाकी ठेवले. डोनाल्ड ट्रंप मात्र मी भिंतीचा विषय ठणकावून मांडला असे म्हणून टेक्सास या मेक्सिकोशी सीमा लागून असलेल्या राज्यात टाळ्या मिळवीतआहेत. एवढी मोठी भिंत कोण, कधी, कशी, कोणाच्या पैशाने बांधणार ही चिंता विद्वानांपुरती मर्यादित आहे. टेक्सासमधील जनमत मात्र सुखावले आहे. पण यात धोका असा आहे की, अमेरिकेत येनकेनप्रकारेण स्थायिक झालेले मेक्सिकन मतदार मात्र डेमोक्रॅट पक्षाकडे वळले आहेत. त्यांना चुचकारण्याचा कार्यक्रम डोनाल्ड ट्रंप यांनी हाती घेतला आहे. तुम्हाला डेमोक्रॅट पक्ष मोक्रॅट पक्ष फक्त आश्वासने देऊन तुमच्या तोंडाला पाने पुसत असतो. मी तुम्हाला खरीखुरी मदत करीन. अहो, टेक्सास हे माझे दुसरे घर आहे. माझे अनेक प्रकल्प टेक्सासमध्ये आहेत.



. दी वेट फूट ड्राय फूट पाॅलिसी
वसंत गणेश काणे
दी वेट फूट ड्राय फूट पाॅलिसी हा एक धोरणात्मक भाग असून १९९५ पासून अमलात आला आहे. क्यूबा व अमेरिका यात १९६६ पासून क्यूबन अॅडजस्टमेंट अॅक्ट अस्तित्वात आहे. १९९५ मध्ये या ॲक्टमध्ये अशी सुधारणा करण्यात आली की, जी व्यक्ती क्यूबामधून अमेरिकेत पळून येईल तिला एक वर्षानंतर अमेरिकेत निवासाचा अधिकार मिळेल.  क्यूबा सरकारशी त्यावेळच्या क्लिंटन( तेव्हा हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते) शासनाचा असा करार झाला आहे. अमेरिकन सागरी सीमेत जे लोक अडवले जातील त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. तेव्हापासून हा ‘वेट फूट, ड्राय फूट’ शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे.
क्युबाचा जो नागरिक अमेरिका व क्युबा यांना अलग करणाऱ्या पाण्यात असतांना पकडलाअसेल ( वेट फूट) त्याला तात्काळ क्युबा किंवा अन्य देशात परत पाठविण्यात येईल पण जो किनारा गाठेल ( ड्राय फूट) त्याला कायदेशीर स्थायी निवासाचा ( लीगल परमनंट रेसिडेंटचा) अधिकार ( स्टेटस) व यथावकाश नागरिकत्व प्राप्त होईल. याचा परिणाम असा झाला की क्युबातून तिथल्या दारिद्य्राला कंटाळून किंवा तिथल्या जुलमी राजवटीपासून सुटका करून घेऊन अनेक क्युबन नागरिक लहान मोठ्या बोटीतून अमेरिकेच्या गस्ती बोटींची नजर चुकवून अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ येतात व पाण्यात उड्या मारून पोहतपोहत अमेरिकेचा किनारा गाठतात. एकदा का त्यांचे पाय जमिनीला लागले ( ड्राय फूट) की त्यांना अमेरिकेत निवासाचा व यथावकाश नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होतो. कारण अमेरिकन सागरी मर्यादेत प्रवेश करणाया व्यक्तींना अमेरिका थोपवील व अमेरिकेत येऊ देणार नाही.
असा लोकविलक्षण करार करण्यामागचे कारण काय असावे? अमेरिकेची दारे जगातील सर्व निर्वासितांसाठी/ परागंदा झालेल्यांसाठी खुली असतील, असा या देशाचा दावा आहे. पण कॅस्ट्रोच्या जुलमी राजवटीला कंटाळून अख्खा क्यूबाच आश्रयाला येतो की काय अशी स्थिती निर्माण व्हायची वेळ आली म्हणून या उदारमतवादाला मुरड घालण्यासाठी हा नियम समाविष्ट झाला असावा. क्यूबालाही  एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ द्यायचे नव्हते व अमेरिकेलाही अरब व उंटाच्या गोष्टीची आठवण होत असावी. या गोष्टातल्या अरबाने ऊंटाला तंबूत आश्रय दिला आणि नंतर जागा न उरल्यामुळे त्याला स्वत:लाच तंबूबाहेर पडायची वेळ आली.

१९६० ते १९८० या कालखंडात हजारो क्युबन नागरिक बोटीतून अमेरिकेत प्रवेश करते झाले. याला अटर्नी जनरल्स पॅरोल ॲथाॅरिटीचे पाठबळ होते.या धोरणानुसार जगातील कोणत्याही परागंदा, हद्दपार, विस्थापित व्यक्तीला अमेरिकेत आश्रय दिला जाईल, अशी ग्वाही दिलेली होती. १९६० ते १९८० च्या दरम्यान हजारो क्युबन नागरिक समुद्रमार्गे अमेरिकेत आले. १९८० मध्ये तर १ लक्ष २५ हजार क्युबन व २५ हजार हैती लोक लोक अमेरिकेत आश्रयाला आले. ह्याला मरीयल बोटलिफ्ट म्हणून संबोधले जाते.
१९९४ मध्ये कॅस्ट्रोने केलेल्या प्रक्षोभक भाषणानंतर हॅवाना या राजधानीच्या ठिकणी दंगली उसळल्या आणि प्रचंड संख्येत लोक आश्रयाला आले. १९९५ पर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक सोडल्यास अमेरिकेने कोणालाही परत पाठविले नव्हते. पण अमेरिकेत गुन्हे करणाऱ्या क्युबन नागरिकांना सुद्धा परत घ्यायला क्युबाची तयारी नसे, असे म्हणतात.
  स्थलांतर करणाऱ्यांना आश्रय व पुढे यथावकाश देण्याच्या योजनेत क्लिंटन प्रशासनाने ९ सप्टेंबर १९९४ ला महत्त्वाचे बदल केले. स्थलांतर सुरक्षित, कायदेशीर व पद्धतशीरपणे व्हावे, या हेतूने आश्रय देण्याच्या योजनेत बदल करण्यात आले.
१. प्रवेश करण्याचे हेतूने समुद्रमार्गे येणाऱ्या क्युबन लोकांना अडविल्यानंतर त्यांना अमेरिका प्रवेश देणार नाही तर त्यांना दुसया एखाद्या सुरक्षित जागी ठेवेल. या धोरणाला सेफ्टी आॅफ लाईफ ॲट सी असे संबोधण्यात आले. समुद्रमार्गे येऊ इच्छिणायाचे तसे त्यांनी करू नये, म्हणून मन वळवण्याचे क्युबानेही मान्य केले.
२. बेकायदेशीर रीत्या किंवा हिंसक प्रकारे अमेरिकेत कुणी प्रवेश करू नये, या मुद्यावर अमेरिका व क्युबा यांचे एकमत झाले.
३. दर वर्षी २० हजार क्युबन नागरिकांना अमेरिका प्रवेश देईल, हे अमेरिकेने मान्य केले.
४. अमेरिकेत समुद्रमार्गे येतांना अडवलेल्या क्यूबन नागरिकांना आपल्या इच्छेने क्युबात परत जायचे असेल तर त्यासाठी हे दोन्ही देश राजी झाले

Comments

Popular posts from this blog

कशासाठी मतांसाठी, अध्यक्षाच्या पदासाठी

अमेरिकेत द्विपक्षीय राजकारणाच्या शेवटाची सुरवात?

अमेरिकींचा अभूतपूर्व संभ्रम