अमेरिकेतील दोन बड्या पक्षांची दिमाखदार संमेलने

ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे ओहायो प्रांतातील क्लिव्हलंड येथील व त्यानंतर डेमोक्रॅट पक्षाचे पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील फिलाडेल्फिया येथील अशी दोन दिमाखदार संमेलने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पार पडली आहेत. या अधिवेशनांमध्ये डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिंटन यांना अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून अनुक्रमे डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षाने घोषित केले. तो पर्यंत हे दोघेही आपापल्या पक्षाचे गृहीत उमेदवार( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) च होते. म्हणजे असे की ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी म्हणजेच) रिपब्लिकन पक्षाच्या च्या देशभरातील सदस्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना व डेमोक्रॅट पक्षाच्या देशभरातील सदस्यांनी हिलरी क्लिंटन क्लिंटन यांना उमेदवारी मिळावी, अशी इच्छा मतदान करून व्यक्त केली होती. पण या दोघांच्या उमेदवारीवर त्या त्या पक्षांच्या राष्ट्रीय संमेलनात शिक्कामोर्तब व्हावे लागते. तसे ते आता झाले आहे. शिक्कामोर्तबाचा हा प्रकार रंजक तसाच बोधप्रदही आहे.
रिपब्लिकन पक्ष - रिपब्लिकन पक्षाच्या संमेलनाचे दोन प्रमुख उद्देश होते क्लिव्हलंड येथील संमेलनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचा प्रमुख उद्देश डोनाल्ड ट्रंप यांची प्रतिमा थोडी सोज्वळ स्वरुपात उभी करणे व ती ओव्हल ऑफिसला (अमेरिकेच्या अध्यक्षाचे कार्यालय) मानवणारी आहे, हा समज जनमानसात रुजवण्याचा आहे. तसेच या निमित्ताने पक्षांतर्गत जो अभूतपूर्व असा संघर्ष प्राथमिक स्तरावरील निवडींच्या वेळी झाला, त्याची अजूनही धुमसत असलेली आग शमवून, पक्ष एकजिनसी स्वरुपात ८ नोव्हेंबर २0१६ च्या अध्यक्षपदाच्या लढतीसाठी सज्ज करणे हा दुसरा उद्देश आहे. काहीही झाले तरी ट्रंप नकोच, ही पक्षांतर्गत चळवळ शमली असली तरी ती पुरतेपणी थंडावलेली नाही. या पार्श्वभूमीवर क्लिव्हलंडला पक्षाच्या अधिवेशनाच्या काळात दंगली माजलेल्या दिसू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तसेच दंगली झाल्या तर त्यांचा परिणाम ट्रंप यांच्या प्रतिमेचा उजळपणा कमी होण्यात होईल, हे पक्ष जाणून आहे.
ट्रं व पेन्स ही दुक्कल : डोनाल्ड ट्रंप यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार निवडताना, त्याची निवड जाहीर करताना व त्याच्या निवडीमागचे (राज) कारण सांगतांना आपल्या स्वभावाला साजेसेच वर्तन केले. इंडियानाचे गव्हर्नर माईक पेन्स यांची निवड न्यूयॉर्क येथे त्यांनी साधेपणाने जाहीर केली. एरवी ही एक इव्हेंट असते. पण प्रकाशझोत आपल्यावरच राहील, याची पुरेपूर काळजी ट्रंप यांनी घेतली. या निमित्ताने केलेल्या भाषणाचा प्रमुख भाग स्वत:ची स्तुती व थोरवी सांगण्यात खर्च करून आपल्या भूमिकेचा अंदाज घेणे/येणे कसे अशक्य आहे हे वार्तांकन करणार्यांना जाणवून दिले. माईक पेन्स यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक बाबतीतच अलौकिक आहे, हे सांगतांना यांच्या निवडीमागे पक्षात एकोपा निर्माण व्हावा म्हणून ही निवड माझ्यासारख्या उपर्याने (पक्ष कार्यकर्ता नसणार्याने) करणे आवश्यकच होते, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. महिला, अल्पसंख्यांक व समलिंगी यात ट्रंप यांची प्रतिमा मुळीच चांगली नाही. त्यातून गर्भपात, कुटुंब नियोजन, समलिंगीचे प्रश्न व स्थलांतरितांचे प्रश्न याबाबत माईक पेन्स हे तर पराकोटीचे उजवे व सनातनी विचारांचे समजले जातात. इंग्रजीचा अवास्तव पुरस्कार (अमेरिकेत स्पॅनिश बोलणार्यांची संख्या बरीच आहे) हा ही अडचण निर्माण करणारा मुद्दा आहे. तिनदा बाशिंग बांधणारा उतावळा, म्हणून ट्रंप यांची संभावना होत असते. म्हणूनच बहुदा सुसंस्कृत जनमानसाच्या त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसाव्यात/नाहीत.
अशीही ट्रंप व पेन्स यांची दुक्कल पाहून हिलरी क्लिंटन व त्यांचे सर्मथक यांना हर्षाच्या उकळ्या फुटत आहेत. अमेरिकन महिलावर्ग ही दुक्कल साफ नाकारील, असे त्यांना वाटते आहे. ७७ टक्के महिलांनी ट्रंप यांच्याबाबत आपले प्रतिकूल मत नोंदविलेही आहे.
प्रतिमा उजळण्याचे प्रयत्न, सफल की असफल? : ट्रंप यांची प्रतिमा उजळण्याची तजवीज हा चार दिवस चालणार्या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. भीमदेवी थाटात गर्जना करणारा (बॉंबॅस्टिक), भावनावश वृत्तीचा (इंपल्सिव्ह), दिखावूपणात तरबेज असलेला (शोमन) व वक्तृत्त्वाने केवळ सभा गाजवणारा आणि मुख्य म्हणजे सोळा प्रतिस्पर्ध्यांचा खातमा पक्षांतर्गत निवडणुकीत करणारा उपरा ही आजची ट्रंप यांची जनमानसात असलेली प्रतिमा पुसून टाकणे आणि एक खराखुरा (सबस्टँटिव्ह) व सहानुभूती बाळगणारा (कंपाशनेट) अशी त्यांची प्रतिमा उभी करायची आहे. त्यांचे शब्दनिपुणतायुक्त रोखठोक वक्तृत्त्व लोकप्रिय असते, असे त्यांचे सर्मथक म्हणतात. पण यात मांडलेल्या मुद्यांमुळे अल्पसंख्यांक व महिला मतदार त्यांच्या वाट्यालाही उभे राहण्यास तयार नाहीत. (बहुदा) यावर उपाय म्हणून त्यांच्या तृतीय पत्नीने (पूर्वाश्रमीची फॅशन मॉडेल असलेल्या) - मेलानियाने पतीच्या सर्मथनार्थ राष्ट्रीय संमेलनात एक उत्कृष्ट भाषण केले व वाहवा मिळविली. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. एका काकदृष्टी असलेल्या वार्ताहराने हे भाषण म्हणजे बराक ओबामांच्या पत्नीने मिशेल ओबामाने चार वर्षांपूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात केलेल्या भाषणाची पूर्णपणे नक्कल आहे, हे सप्रमाण दाखवून रिपब्लिकनांच्या तोंडचे पाणीच पळविले. हे म्हणजे आपल्या केजरी आणि दिग्गिराजांनाही मागे टाकण्यासारखे झाले. टिंगलटवाळीला एकच ऊत आला आहे. इतका की, तोच एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. दुसर्या दिवशी रिपब्लिकन पक्षाचा आरोप चुकीचा आहे, असा खुलासा प्रसिद्ध झाला. एका वृत्तपत्राने मिशेल ओबामाचे ४ वर्षांपूर्वीचे व मेलानिया ट्रंपचे आताचे अशी दोन्ही भाषणे शेजारीशेजारी छापली होती. दोन्ही भाषणाचा आशय सारखाच असला तरी शब्द वेगळे आहेत. शेवटचे वाक्य मात्र तंतोतंत सारखे आहे. यात ५0 शब्द आहेत. अमेरिकन निकषानुसार हा चौर्याचा प्रकार मानला जातो.
अमेरिकन राजकीय विेश्लेषक जगातल्या खोचक पत्रकांराचे मुकुटमणी शोभावेत, असे आहेत. त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. त्यांच्यासमोर आपले राजदीप, करण किंवा बरखा म्हणजे किस झाडकी पत्ती, अशी स्थिती आहे. पत्नीच्या भाषणाचा हा मुद्दा आता ८ नोव्हेंबरपयर्यंत नवनवोन्मेषशाली ठरावा, असे प्रयत्न डेमोक्रॅट व पत्रकार करणार यात शंका नाही.
दिग्गजांची अनुपस्थिती एक अनपेक्षित अडचण : याशिवाय अडचणीचा आणखी एक मुद्दा असा की, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक दिग्गजांनी संमेलनाला दांडी मारली आहे. दोन माजी अध्यक्ष व अध्यक्षपदाचेच पण पराभूत झालेले दोन माजी उमेदवार हे संमेलनात दिसणार नाहीत. कुणी फिशिंगला गेले आहेत, कुणी अंगणातील गवत कापत ( लँड मोविंग) आहेत, कुणी ग्रँड कॅनियनला पदयात्रा (ट्रेकिंग) काढणार आहेत, याचवेळी सिनेट व हाऊसच्याही निवडणुका आहेत. त्यासाठीचे उमेदवार एकट्यानेच स्वतंत्र प्रचार करणार आहेत, काही मतदारांशी संपर्क दौरा आयोजित करीत आहेत. याच काळात एक महिला उमेदवार अलास्काला ४000(चार हजार) मैल दूर विमानातून प्रचार करीत आहे. एक ना दोन. हजार कारणे पुढे येत आहेत.
अशी पक्षांतर्गत स्थिती आहे.
ट्रंप यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र : अशा परिस्थितीत ट्रंप यांचे कसे होणार? त्यांचे प्रचाराचे मुद्दे कोणते राहणार? त्यांची बलस्थाने कोणती? अतिरेक्यांविरुद्ध युद्ध पुकारणार, ही लोकांना आवडणारी सकारात्मक भूमिका; बेकारांना रोजगार, नोकर्यात अमेरिकनांना प्राधान्य, ही आकर्षक आश्वासने; डेमोक्रॅट पक्षाच्या देशहितविरोधी धोरणांचा निषेध, हिलरींनी खाजगी ईमेलचा सरकारी कामासाठी वापर केला व गुप्ततेचा भंग केला तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही केला व ही दखलपात्र गुन्हेगारी आहे, मुस्लिमांकडून क्लिंटन फाऊंडेशनसाठी मदत घेतल्यामुळे अतिरेक्यांबाबत मिंधेपणाची व बोटचेपी भूमिका घेतली, गठ्ठा मतांसाठी अवैध मेक्सिकन घुसखोरांना नागरिकत्त्व दिले, अमेरिकन नोकर्यांवर परदेशींना कब्जा करू दिला, लिबियात अमेरिकन वकिलातीवर हल्ला झाला, अमेरिकन नागरिक मृत्यूमुखी पडले. पण तरीही हिलरींनी बोटचेपी भूमिका घेऊन मुस्लिमधार्जिणेपणाचे वर्तन केले; हे हिलरी व डेमोक्रॅट पक्षाचे पाप आहे व ते आपण दूर करू, असा भरभक्कम मसाला ट्रंप यांनी गोळा केला आहे. त्यांची मतपेढी दिवसेदिवस वाढतच जाईल. आता ती आणखी खाली जाण्याची शक्यता नाही. आता सौभाग्यवती ट्रंप पुन्हा तोंड उघडतील असे वाटत नाही. पण संमेलनात ट्रंप यांच्या पहिल्या दोन पत्नींपासून झालेल्या चार चिरंजीवांचीही भाषणे यानंतर व्हायची असल्यामुळे हा कार्यक्रम जर सुरळीत पार पडला म्हणजे मिळवली, असे सर्वांना वाटत असताना समाधानाची बाब ही की चिरंजीव मंडळींनी नावे ठेवता येतील, असे काहीही केले नाही. अतिरेक्यांशी सरळ दोन हात करू इच्छिणारा धडाकेबाज नेता, ही आपली प्रतिमा आपल्याला विजय मिळवून देईल, असा विश्वास ट्रंप बाळगून आहेत. शिवाय मायकेल पेन्स हा उपाध्यक्षपदाचा उमेदवार पक्ष कार्यकर्ता आहे, ट्रंप सारखा उपरा नाही. म्हणूनच उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच त्यांनी देशाला आश्वासन दिले, अपार कष्ट करीन, तुमचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही.
डेमोक्रॅट पक्षाचे दर्जेदार संमेलन - ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) म्हणजेच रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅट पक्षाचे संमेलन उठून दिसते. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे भाषण हे या संमेलनाच एक प्रमुख वैशिष्ट्य ठराव,असे झाले. हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बराक ओबामा यांनी समाधान व्यक्त केले तेव्हा ‘ह्यांचं मत तेच माझं मत’, अशी त्रोटक प्रतिक्रिया होती मिशेल ओबामा यांची. अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांची. पण हे असं सांगून पुरता अर्थबोध होणार नाही. सगळं सुरवातीपासूनच सांगितलं पाहिजे. हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्याचे निश्चित झालं आणि विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी या निर्णयाचं अतिशय उत्साहानं, आनंदानं स्वागत केलं. वृत्तसृष्टीनं या वृत्ताला साजेसं महत्त्वही दिलं. पण अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली की, त्याचं मतही ‘ह्यांच्या’ मतासारखंच आहे. एखाद्या अस्सल भारतीय पतिव्रतेकडून कौतुकाची थाप मिळावी, असं हे मत आहे.
जिवाभावाच्या मैत्रिणी - विनोद बाजूला ठेवूया. मिशेल आणि हिलरी या दोघी एकमेकींच्या सध्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मिशेल यांच्या खास क्लबच्या हिलरीही सदस्या आहेत. हिलरी सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर कार्यरत असतांना या दोघी अनेकदा एकाच व्यासपीठावर आढळून आल्या आहेत.
अराजकीय भूमिका - पण मिशेल यांची भूमिका प्रामुख्याने अराजकीय स्वरूपाचीच राहिली आहे. बराक ओबामा दोनदा अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मिशेल याही त्यांच्यासाठीच्या प्रचार मोहिमेत सहभागी असत. पण त्यांनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले नव्हते. त्या म्हणत , ‘राजकारण महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. पण मी राजकारणी नाही. राजकारण हे माझे ध्येय कधीच नव्हते’. घराबाहेर किती वेळ घालवायचा याबद्दलचे त्यांचे नियम कडक आहेत. याबाबत एका निश्चित व पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार त्याचे काम सुरू असते/असायचे. त्यांचा प्रचारकार्याचा कार्यक्रम आखणाऱ्या चमूला त्यांच्या स्पष्ट व नेमक्या सूचना असत. ‘प्रचारासाठी इतका इतका वेळ मी काढून ठेवला आहे. त्यात काय काय करायचे ते तुम्ही ठरवा. तो आटोपला की मला कुणी भेटायचे सुद्धा नाही. अगदी फोन सुद्धा करायचा नाही’. डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात त्या उपस्थित राहत असत एवढेच. त्यांची भूमिका एखाद्या राजकारण्याची कधीच नसे.
अराजकीय भूमिका हेच शक्तिस्थान -आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या या भूमिके व वृत्तीमुळेच त्यांना भरपूर राजकीय बळ मिळाले आहे. याचा प्रत्यय फिलाडेल्फिया येथील डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलन प्रसंगी, त्यांनी हिलरींना पाठिंबा देणारे जे भाषण केले, त्या निमित्ताने आला. २६ जुलैची सकाळ. मिशेल यांनी भाषणाला प्रारंभ केला आणि काही क्षणातच त्यांनी सभागृहाचा ताबा घेतला. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकचित्ताने त्यांचे भाषण ऐकत होते. प्रतिसाद देत होते.
१. आठ वर्षांपूर्वी हिलरींना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा त्या रागावल्या नाहीत किंवा निराश झाल्या नाहीत. गाशा गुंडाळून त्या घरीही गेल्या नाहीत. कारण एक सार्वजनिक कार्यकर्ता या नात्याने व्यक्तिगत निराशेपेक्षा कितीतरी काम आपल्या पुढ्यात आहे, याची त्यांना जाणीव होती.
२. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी त्यांनी पाठ फिरवलेली नाही. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिल आहे.
३. आपले प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रंप यांच्याजवळ रोजगार देण्यासाठीच्या कोणत्याही योजना नाहीत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाहीत की ज्येष्ठ नागरिकांसाठीही नाहीत. त्यांच्या सर्व योजना त्यांच्यासारख्या श्रीमंतांसाठीच आहेत.
४. हिलरींचा स्वभाव असा आहे की, त्या प्रतिकूलतेसमोर कधीही झुकत नाहीत, की तडजोड करीत नाहीत.
५. केवळ हिलरींमुळे आता माझ्या मुलींची आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच मुलामुलींची ही खात्री झाली आहे की, एक महिला अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकते.
६. पुढील चार /आठ वर्षात आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची क्षमता कोणात असेल, हे या निवडणुकीने ठरणार आहे.
७. जेव्हा एखादा क्रूरपणाने किंवा अडदांडपणाने वागतो बोलतो, तेव्हा तुम्ही त्या पातळीला जायचे नसते. कधीच नाही. ते जेवढे खालच्या पातळीवर उतरतील, तेवढाच आपण आपला स्तर उंच ठेवायचा असतो, हे आपले बोधवाक्य आहे.
८. आपल्या मुलांचे भवितव्य कुणाच्या हाती सोपवायचे हेच या आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचे असते. ही जबाबदारी विश्वासाने ज्या व्यक्तीवर सोपवावी अशी माझ्या मते एकच व्यक्ती आहे. तीच व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहे आणि ती व्यक्ती आहे आपली मैत्रीण हिलरी क्लिंटन.
९. आपल्या जबाबदारीकडे गंभीरपणाने पाहील अशीच व्यक्ती मला माझ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी अध्यक्षपदी हवी आहे. अध्यक्षाला हाताळावे लागणारे विषय काळे किंवा पांढरे असे ठोकळ स्वरूपाचे नसतात. ते मोजक्या शब्दात मांडता येत नाहीत.
१०. हा देश श्रेष्ठ नाही, काहीतरी करून आपल्याला त्याला श्रेष्ठत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे असे कुणी म्हणत असेल तर त्याचे ऐकू नका. कारण अगदी या क्षणी सुद्धा हा देश या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ देश आहे.
भाषणाची परिणामकारकता -मिशेल ओबामा यांचे हे भावपूर्ण वक्तव्य ऐकत असतांना श्रोत्यांच्या मनात वेगवेगळे तरंग उठत होते. साशा आणि मालियाची माता या नात्याने त्या बोलत असतांना श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर नामनिर्देश न करता त्या जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांना धारेवर धरत होत्या तेव्हा श्रोते त्यांच्या चपखल शब्दयोजनेला मनापासून दाद देत होते. अजूनही ज्या मतदारांची मते संदिग्ध असतील त्यांची मते अनुकूल करण्याचे सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात आहे, असा विश्वास संमेलनात उपस्थित असलेले प्रतिनिधी व्यक्त करतांना दिसत होते. बर्नी सॅंडर्स यांचा हिलरींना असलेला कडवा विरोध आता मावळला आहे. पण पक्षात एकवाक्यता निर्माण करण्याचे सकारात्मक सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात होते. अशा शब्दात वार्तांकन करणाऱ्यांनी मिशेल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
शीर्षक बदलले - एका वृत्तपत्रातील संपादकीय कक्षातील घडामोडी रंजक व बोधप्रद ठराव्यात, अशा आहेत. वार्ताहराने संपादकीय कक्षाकडे मिशेल यांच्या भाषणाअगोदर ट्वीट केले होते की, प्रथम पृष्ठावरील हेड लाईन ‘बर्नी सॅंडर्स व हिलरी यातील बेबनावाशी’ संबंधित असेल. तीन तासांनी त्याने पुन्हा ट्वीट केले, ‘हेडलाईन बदलावी लागणार!’ ‘सभा मिशेल यांनी जिंकली’. नंतरचे ट्वीट होते, ‘ २०२० च्या डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार असणार मिशेल ओबामा! सभागृहातील सर्वांच्या तोंडचा मुद्दा.’ २०२० साली काय व्हायचे होईल. पण निदान या निवडणुकीत तरी हिलरींसाठी मिशेल यांचे हे भाषण नवसंजीवनी स्वरुपाचे ठरणार हे मात्र नक्की.
क्लिंटन- केन ही जोडगोळी - हिलरी क्लिंटन यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार म्हणून व्हर्जिनियाच्या टिम केन या ५८ वर्षाच्या तरूण पण अनुभवी, अभ्यासू पण धडाडीच्या, स्पॅनिश भाषेत अस्खलित बोलू शकणाऱ्या ( स्पॅनिश भाषा बोलणारे बरेच मतदार आहेत) व गर्भपात विरोधी मत असलेल्या (अमेरिकेत गर्भपाताला विरोध करणारे अनेक सनातनी विचाराचे मतदार आहेत) एका चतुर साथीदाराची निवड केली आहे. प्रतिपक्षाचे हल्ले परतवून लावण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षपदाच्या साथीदाराची असते. हे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता टिम केन यांच्यात आहे. अशा जोडीदाराची गरज हिलरी क्लिंटन यांना पदोपदी भासणार आहे.
अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी आपापल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडगोळीची (टिकेट) निवड करीत, निवडणुकीच्या रणांगणात पदार्पण करून पुढील तीन महिन्यातील रणधुमाळीतील पहिले पाऊल टाकले आहे.
इलेक्टोरल कॉलेज - यात एकूण ५३८ सदस्य असतात. प्रत्येक राज्याच्या वाट्याला किती इलेक्टर्स असतील? त्या राज्याची प्रतिनिधींची (रिप्रेझेंटेटिव्हज) संख्या अधीक सिनेटर्सची संख्या असा तो नियम आहे. या नियमानुसार कॅलिफोर्नियाच्या वाट्याला ५३+२ =५५ इलेक्टर्स येतील तर लहानातलहान राज्याच्या वाट्याला १+२=३ इलेक्टर्स येतील. या न्यायाने ४३५+१00=५३५ ही संख्या येत असताना इलेक्टर्स ५३८ कसे? विशेष कारणास्तव नेब्रास्का व मेन या दोन राज्यांना हे जास्तीचे इलेक्टर्स मिळतात. अशाप्रकारे ज्या उमेदवाराला २७0 इलेक्टर्स मिळतील तो उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून येतो. एका इलेक्टरचे एक मत या हिशोबाने एकूण इलेक्टोरल मते ५३८ होतील व जिंकण्यासाठी २७० इलेक्टोरल मते ( ५० टक्यापेक्षा निदान एक मत जास्त) आवश्यक राहतील.
विनर टेक्स ऑल- २०१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व रॉम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानतात. मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला विनर टेक्स ऑल असे म्हणून संबोधतात. या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते. २0१२ मध्ये कॅलिफोर्नियात सामान्य मतदारांनी मतदान केले तेव्हा ओबामा व रॉम्नी याना अनुक्रमे ५१ व ४९ टक्के मते मिळाली. म्हणजे ओबामा यांना या राज्यात आघाडी मिळाली. म्हणून डेमोक्रॅट पक्षाचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले असे मानले गेले. मतांच्या टक्केवारीनुसार इलेक्टर्सची वाटणी होत नाही. या नियमाला विनर टेक्स ऑल असे म्हणून संबोधतात.या नियमानुसार प्रत्येक राज्य त्या राज्याच्या वाट्याच्या सर्व इलेक्टर्ससह या किंवा त्या उमेदवाराकडे जाते.
कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स) - अमेरिकेत दोन्ही परंपरागत पक्षांचे बालेकिल्ले म्हणावेत अशी राज्ये आहेत. पण काही राज्ये अशी आहेत की, ज्या राज्यांत दोन्ही पक्षांचे बलाबल जवळपास समसमान असते. निवडणुकीच्या प्रचार मोहीमेद्वारे जो पक्ष ही राज्ये आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, तो निवडणूक जिंकतो. म्हणून या राज्यांना कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स ) असे म्हणतात.
आजच्या हिशोबानुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ आहे. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ७९ इतकी इलेक्टोरल मते हवी आहेत. दोन्ही पक्षांची मिळून एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. म्हणजे १३० इलेक्टोरल मते ही कलाटणी देऊ शकणाऱ्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते आहेत. अशी जवळपास दहा राज्ये असून त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा(२९ मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते), ओहायो (१८ मते), नाॅर्थ करोलिना (१५ मते), व्हर्जिनिया(१३ मते), व्हिस्काॅन्सिन (१० मते) आणि ४ छोटी राज्ये (उरलेली मते) आहेत.

Comments
Post a Comment