अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
पडघम अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे
वसंत गणेश काणे
सध्या अमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुका सुरू असून शेवटी प्रत्येक ( म्हणजे तसे दोनच प्रमुख पक्ष आहेत) पक्षाचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होईल. राष्ट्राध्यक्षाची निवडणूक पुढील वर्षी अखेरीला होणार असली तरी राष्ट्राध्यक्षपदासाठीचा आपल्या पक्षाचा उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया रिपब्लिकन पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीसुरू झाल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आजमितीला थोडेथोडके नव्हेत तर मोजून वीस उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यात राष्ट्रीय स्तरावर वाहिन्यांवर उधड चर्चेच्या ( नॅशनल डिबेट) चांगल्या पाचपेक्षा जास्त फेय्रा आयोजित होतील. यातून प्रत्येकाला व सामान्यजनांना सुद्धा कोण किती पाण्यात आहे ते कळेल व फेरीगणिक एकेक मोहरा गळून पडेल आणि सर्वात शेवटी जे उरतील त्यापैकी एकावर पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात मतदान होऊन पक्ष आपला अध्यक्षपदाचा आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करील. रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांमधील पहिली राष्ट्रीय चर्चा नुकतीच पार पडली आहे. यातून 'कोण कसा' हे उमेदवारांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना व मतदार नसलेल्या जनतेला ( अठरा वर्षाखालील मुलामुलींना व अन्यांना सुद्धा) कळणार आहे.
डेमोक्रॅट पक्षाची अशी संमेलने व चर्चा अजून सुरू झालेली नाही. ती थोड्या उशीराने सुरू होईल. कारण आज या पक्षाचे बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ आहेत.त्यांच्यासमोर इतक्या अगोदर पक्षाचा उमेदवार निश्चित करण्याचे पक्षाने टाळले आहे. पण तरीही दहा / बारा नावे चर्चेत आहेत. विली विलसन, जेफ बाॅस,मायकेल स्टीनबर्ग, हिलरी क्लिंटन, मार्टीन ओमाले, लिंकन शॅफी, बर्नी सँडर्स, ज्यो बिडन या नावांपैकी हिलरी क्लिंटन या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींचे नाव आघाडीवर होते. पण आता बर्नी सँडर्सचा घोडा आघाडी घेतांना दिसतो आहे. आणखीही आपले घोडे पुढे दामटीत आहेत. सामान्यत: सर्वच पक्षांचे उमेदवार ( ज्यांचा गांभीर्याने विचार होईल/होतो) एकतर एखाद्या राज्याचे गव्हर्नर तरी असतात किंवा सिनेटर ( संसद सदस्य) तरी असतात.
गेल्या निवडणुकीत रिपब्लिकन असलेले अध्यक्ष जाॅर्ज बुश हे आपल्या कृती व उक्तीमुळे इतके इतके अप्रिय झाले होते की, डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बराक ओबामा हे 'आशा आणि बदल' ( होप ॲंड चेंज ) हे दोनच आणि फक्त हेच दोन शब्द उच्चारित आणि उच्चारून विजयी झाले होते, असे चेष्टेखोर म्हणतात. 'हा विनोद नाही बरं का', असा खुलासा करून व करीत दुसरा विनोदही ते करतात. या वेळची निवडणूक अशी सोपी असणार नाही. उमेदवार कोणता यावर बरेच काही अवलंबून राहील, असे दिसते. निवडणुकीच्या रिंगणातील वातावरण हळूहळू तापत जाईल. देशाचे तापमान मात्र आता हळूहळू थंड होत जाईल. ते एप्रिलपर्यंत पुन्हा वाढीस लागलेले असेल.

Comments
Post a Comment