अमेरिकेत अध्यक्षपदासाठीचा उमेदवार कसा निवडतात?

वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी प्रत्येक पक्षाची राज्य शाखा राज्य पातळीवर प्रतिनिधींची (डेलिगेट्स) निवड करते. राज्याच्या लहानमोठेपणावर प्रतिनिधींची संख्या वेगवेगळी असते. या प्रतिनिधींची देश पातळीवर परिषद (कनव्हेंशन) आयोजित करतात. या प्रक्रियेला प्रायमरीज असे नाव आहे.
काॅकस(मेळावा) - मुळात काॅकस ही पद्धती होती. १९०० सालपासून प्रायमरी अस्तित्त्वात आली. त्यामुळे दिवसेदिवस प्रायमरीजची संख्या कमी होत चालली आहे. कोणताही मतदार आपल्या आवडीच्या पक्षाकडे आपली नोंदणी करू शकतो. आपल्या राज्याचे हितसंबंध लक्षात ठेवून पक्ष सदस्य व नोंदणीकृत मतदार प्रतिनिधींची निवड करतात. हे प्रतिनिधी एकतर एखाद्या उमेदवाराचे पुरस्कर्ते असतात किंवा ते कुणाशीही बांधिलकी नसलेलेही (अनकमीटेड)असू शकतात. अनौपचारिकपणे आपापसात चर्चा करून मते जाणून घेऊन प्रतिनिधींची निवड करतात.
पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा(मतदारांचा) जास्तीतजास्त सहभाग व प्रभाव असावा हा हेतू समोर ठेवून विसाव्या शतकात एक चळवळ उभी झाली. यातून प्रायमरी इलेक्शनचा विकास झाला. या प्रक्रियेत नोंदणीकृत मतदार उमेदवाराची निवड गुप्त मतदान पद्धतीने करतात.
प्रायमरीत मतदान करण्यास कुणाला पात्र मानावे यावरून प्रायमरींचे तीनप्रकार आहेत.
क्लोज्ड प्रायमरी व ओपन प्रायमरी.
१. क्लोज्ड प्रायमरी - यात नोंदणीकृत मतदाराची ज्या पक्षाशी बांधिलकी आहे, त्या पक्षाच्या प्रायमरीतच तो मतदार मतदान करू शकतो.
समजा, एखाद्या मतदाराने डेमोक्रॅट पक्षाचा सदस्य असेल तर तो डेमोक्रॅट पक्षाच्या प्रायमरीतच मतदान करू शकेल.
२. ओपन प्रायमरी - नोंदणीकृत मतदार कोणत्याही पक्षाच्या प्रायमरीत मतदान करू शकतो. पण मग त्याला दुसऱ्या पक्षाच्या प्रायमरीत मतदान करता येत नाही.
३. ब्लॅंकेट प्रायमरी - हा प्रकार अजून फारसा रूढ नाही. यात नोंदणीकृत मतदार सर्व पक्षांच्या प्रायमरीत मतदान करू शकतो.
प्रायमरीतील मतपत्रिकेवर नाव कुणाचे?- या मतपत्रिकेवर प्रतिनिधीचे नाव असावे की उमेदवाराचे? यात दोन प्रकार आहेत
१.प्रत्यक्ष पद्धती (डायरेक्ट मेथड) - यात अध्यक्षपदासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव मतदार नोंदवतो.
२. अप्रत्यक्ष पद्धती ( इनडायरेक्ट मेथड) - यात मतदार आपला प्रतिनिधी निवडतो. या प्रतिनिधींनी आपली अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतची पसंती जाहीर केलेली असते किंवा नसेलही(अनकमीटेड).
अशा निरनिराळ्या पद्धतींपैकी एका किंवा एकापेक्षा जास्त पद्धतींचा आधार घेऊन राजकीय पक्ष जनमताचा कानोसा घेतात. कधीकधी पक्ष ओपन प्रायमरीचा आधार घेत नाहीत. कारण ओपन प्रायमरीत अन्य पक्षांचे सदस्यही त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा, हे ठरवण्यात सहभागी असतात.
कुणाच्या वाट्याला किती प्रतिनिधी (डेलिगेट्स)?
समजा एका राज्यात १०० मतदान झाले. ‘अ’ या उमेदवाराला ६० ‘ब’ ला २० आणि ‘क’ ला २० मते पडली. तर ‘अ’च्या वाट्याला ६ आणि ‘ब’ व ‘क’ च्या वाट्याला प्रत्येकी २ राज्य/देश स्तरावरील परिषदेसाठी प्रतिनिधी मिळतील. एकूण राज्ये पन्नास आहेत. यात अ,ब व क च्या वाट्याला किती प्रतिनिधी येतात ते पाहिले जाते. या पद्धतीला प्माणशीर पद्धत (प्रपोर्शनल मेथड) असे म्हणतात. डेमोक्रॅट पक्षाने ही पद्धत स्वीकारली आहे.
रिपब्लिकन पक्ष काही राज्यात ही पद्धत स्वीकारतो तर काही राज्यात ‘जो जिता वही सिकंदर’( विनर - टेक - आॅल ही पद्धत स्वीकारतो. या पद्धतीनुसार एकट्या अच्याच वाट्याला १० प्रतिनिधी येतात.
प्रत्येक पक्ष देश पातळीवर प्रतिनिधींची परिषद आयोजित करतो. सध्या राज्य पातळीवरील परिषदांची वृत्ते आपण वाचतो आणि कुणाच्या वाट्याला किती प्रतिनिधी( पर्यायाने मते) ते आपल्याला कळते व कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर ते आपल्या कानावर येत असते.
रिपब्लिकन पक्षाच्या देश पातळीवरील परिषदेत एकूण २,४७२ प्रतिनिधी (डेलिगेट्स) असणार आहेत. त्यापैकी १,२३७ प्रतिनिधी (डेलिगेट्स) मिळणे ही बाब उमेदवारीच्या शर्यतीत विजयासाठी आवश्यक आहे. सध्या डोनाल्ड ट्रंप आघाडीवर आहेत.
डेमोक्रेटिक पक्षाच्या देश पातळीवरील परिषदेत एकूण एकूण ४,७६३ प्रतिनिधी (डेलिगेट्स) असणार आहेत; त्यापैकी २,३८२ प्रतिनिधी (डेलिगेट्स)मिळणे ही बाब उमेदवारीच्या शर्यतीत विजयासाठी आवश्यक आहे. सध्या हिलरी क्लिंटन आघाडीवर आहेत.

Comments
Post a Comment